पुणे-शहर निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम , अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त निवडणूक प्रसाद काटकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी भूषण जोशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका सहाय्यक आयुक्त संजय पोळ तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक सांगडे यांचे समवेत नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय येथे निवडणुकी संदर्भात केलेल्या व्यवस्थेबाबत पाहणी केली. यामध्ये त्यांनी स्ट्रॉंग रूम, मतमोजणी तसेच मतदान कर्मचाऱ्यांचे स्वीकृती आणि वितरण व्यवस्थे संदर्भात पाहणी केली व मार्गदर्शन केले .
तसेच राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी, येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय येथील मतमोजणी व्यवस्थेची पाहणी केली व माहिती घेऊन मार्गदर्शन केले. त्यावेळीस निवडणूक अधिकारी सचिन बारवकर सहाय्यक निवडणूक अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडून देण्यासाठी एकूण ४०११ मतदान केंद्रावर उद्या १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे.
एकूण प्रभागांची संख्या – ४१
एकूण सदस्य संख्या – १६५
- एकूण निवडणूक लढविणारे उमेदवार – ११५३ ( पुरुष ६२७, महिला -५२८)
- सर्वाधिक निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा प्रभाग क्र. ६ – ( ४३ उमेदवार)
- सर्वात कमी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा प्रभाग क्र. ३५- (५ उमेदवार)
- बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या २ (३५ ब व ३५ ड)
( १२/०१/२०२६ रोजी बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांचा प्रस्ताव मा. राज्य निवडणूक आयोगाकडे
मान्यतेस्तव सादर
२) मतदान केंद्रा बाबत माहिती-
एकूण मतदान केंद्रांची संख्या – ४०११
एकूण ठिकाणांची संख्या – ९३२
- संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या – ९०६
- अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या – ००
- सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्र असणारे RO कार्यालय (सिंहगड – १७२ केंद्र)
- सर्वात कमी संवेदनशील मतदान केंद्र असणारे RO कार्यालय
- (शिवाजीनगर २१ केंद्र)
एकूण महिला मतदान केंद्र (पिंक बूथ) – १६ - एकूण आदर्श मतदान केंद्र- १४
- वेब कास्टिंग करण्यात येणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या ८०२ (२०%)
- एकूण परदानशीन मतदान केंद्र – २२
- सोसायटी मधील मतदान केंद्र – २५८ (सर्वाधिक वानवडी रामटेकडी – ६४, सर्वात कमी भवानी पेठ – 0)
- पत्राशेड असलेले मतदान केंद्र – १७०
पत्रा / कापडी पार्टीशन असलेले मतदान केंद्र ७४१
( सर्व मतदान केंद्रावर मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानूसार सुविधा (AMF) पुरविण्यात आलेले आहे.
३) मनुष्यबळाबाबत माहिती.
१) मतदान केंद्रावरील मनुष्यबळ – २५८९९
२) क्षेत्रिय अधिकारी (Zonal Officer) ४५४
३) एकूण नोडल अधिकारी – ३२ (एकूण नोडल अधिनस्त कर्मचारी-२४००)
४) आरोग्य कर्मचारी – १२००
५) मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी १०५६ – सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.)
४) मतदार चिठ्ठी वाटप (Voter Slip Distribution) –
प्रत्यक्ष वाटपास ०८/०१/२०२६ पासून सुरुवात.
आज अखेर मतदार चिट्ठी वाटप ८५%
–
मतदारांना त्यांचे नाव मतदारयादीत शोधणेकरिता pmcvotersearch.digielection.com – सर्च इंजिन सुविधा

