नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित अभ्यासनाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण

Date:

पुणे : कोणी नाट्यछटेतून गणितातील संकल्पना समजावत आहे तर कोणी पर्यावरणाची जागृती करत आहे. कोणी लहानगे नाटीकांमधून भूगोलाच्या संकल्पना स्पष्ट करत दगडांचे आपल्या आयुष्यात असणारे महत्त्व सांगत आहे. असे चित्र पहायला मिळाले ते नाट्यसंस्कार कला अकादमीच्या माध्यमातून आयोजित आंतरशालेय अभ्यासनाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात.

नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे आंतरशालेय अभ्यासनाट्य स्पर्धा आणि सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ निवारा वृद्‌धाश्रमातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी विजेत्या स्पर्धकांनी अभ्यासनाटिकांचे सादरीकरण केले.  

अध्यात्माचे अभ्यासक ब्रह्मर्षी शशिकांत जोशी, वंदे मातरम्‌चे अभ्यासक मिलिंद सबनीस, कराड येथील शिक्षण मंडळाचे पदाधिकारी राजेंद्र लाटकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. या प्रसंगी नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त संध्या कुलकर्णी, दिपाली निरगुडकर उपस्थित होते.

मिलिंद सबनीस म्हणाले, अभ्यासनाट्याच्या माध्यमातून अभ्यासातील संकल्पना सोप्या, सुलभ होऊ शकतात याचा कदाचित विचारही केला नसेल. त्यामुळे यासारख्या स्पर्धा निश्चितच महत्त्वाच्या आहेत. अभ्यासनाट्याची संहिता लिहिणे ही महत्त्वाची कला असून त्यावर शिक्षकांनी अधिक काम करायला हवे.

वयाच्या ७५ व्या वर्षीही प्रकाश पारखी यांचे काम थक्क करणारे असून यातून निश्चितच प्रेरणा घ्यायला हवी, अशी भावना शशिकांत जोशी यांनी व्यक्त केली.

नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला यांच्या माध्यमातून अभ्यासासह कलागुणांना देखील वाव मिळण्यास मदत होते. त्यामुळे अशा स्पर्धांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायला हवे, असे मत राजेंद्र लाटकर यांनी व्यक्त केले.

प्रकाश पारखी म्हणाले, शिक्षक व पालकांच्या पुढाकारातून अभ्यासनाट्याची चळवळ समृद्ध होण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत. तसेच राज्याच्या इतर भागांतही स्पर्धा घेतल्या जाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. वयाच्या ७५व्या वर्षानिमित्त ७५ शाळांमध्ये शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करणार मानस असल्याचेही ते म्हणाले. संध्या कुलकर्णी यांनी निकाल जाहीर केला तर दिपाली निरगुडकर यांनी आभार मानले.

आंतरशालेय अभ्यासनाट्य स्पर्धेचा सविस्तर निकाल

गट क्रमांक 1 ( इयत्ता 3री-4थी) : प्रथम – सिल्वर क्रेस्ट शाळा, सिंहगड रोड (सिटी ऑफ फ्रॅक्शन), द्वितीय – नवीन मराठी शाळा, पुणे (विदूषक – भौमितिक आकाराचा), तृतीय – श्रीमती पार्वती बाई विद्यालय, श्रीधर नगर, चिंचवड (पर्यावरण संवर्धन). उत्तेजनार्थ – दादा गुजर प्राथमिक विद्यालय, हडपसर (दिवस-रात्र-कालचक्र), श्रीमती पार्वतीबाई विद्यालय, चिंचवड (छोटे आजार- घरगुती उपाय).

गट क्रमांक 2 ( इयत्ता 5वी ते 7वी) : प्रथम – सिल्वर क्रेस्ट सिंहगड रोड (रॉक स्टार), द्वितीय – प्रतिभा पवार स्कूल (नैसर्गिक संसाधने), तृतीय – कॅम्प एज्युकेशन सोसायटीची डॉ. सायरस पूनावाला कन्या शाळा, पुणे (संज्ञा देवी), उत्तेजनार्थ –  प्रतिभा पवार स्कूल (गणित),  ह. भ. प. पाटील म.न.पा शाळा क्रमांक 205 वारजे (वनसंपत्ती), सम्राट अशोक विद्यामंदिर, म.न.पा. क्र. 3 जी ,कर्वेनगर  (इंग्रजी,हिंदी,शास्त्र या तीन विषयांवर एकत्रित सादरीकरण).

गट क्रमांक 3 ( इयत्ता 8वी ते 10वी) : प्रथम – अभिजात माध्यमिक विद्यालय (किल्ले पेशी गड), उत्तेजनार्थ – एम्. एस् .एस्. हायस्कूल, चिंचवड, इंग्लिश मीडियम (अर्थ नियोजन)

सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धा निकाल

गट १ – (९ ते १२ वर्षे) : प्रथम – अद्विता दास, द्वितीय – संहिता कुलकर्णी

गट २ – (१३ ते १८ वर्षे) : प्रथम – नित्य पवार

गट ३ – (१९-५० वर्षे) : प्रथम – विदुला शेट्ये, द्वितीय – सोमनाथ भंवर, तृतीय –  स्वाती पुंडे

उत्तेजनार्थ – प्राजक्ता कापुरे, स्मिता मठपती

गट ४- (५० वर्षावरील) : प्रथम – सुहास चव्हाण, द्वितीय – अनघा बोरसे, तृतीय – शिवांगी मलगुंडे, उत्तेजनार्थ – उज्वला केळकर.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अर्थसंकल्प, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर संवाद; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका

व्यापार–उद्योगासाठी अनुकूल धोरणांचा सूर; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे "न्याय...

‘हॉटेल स्वराज्य आणि बार’वर आढळल्या ईव्हीएम मशीन

जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपत असतानाच मोहोळ शहराजवळील 'हॉटेल...

​’एक्सप्रेशन्स २०२६​’​चे  उत्साहात   उद्घाटन 

पुणे​: भारती विद्यापीठ ​इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप पुणे यांच्या...

दीपक पायगुडे, लता राजगुरू यांचा रमाईरत्न पुरस्काराने गौरव

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संतसाहित्याविषयी आस्था होती....