नक्कल नको अस्सल आणा. जनतेचे प्रामाणिक आणि इमानदार प्रतिनिधित्व आम आदमी पार्टी करेल.पुण्यासाठी आम आदमी पार्टीचे निर्धारपत्र

Date:

पुणे : दिल्ली आणि पंजाब मध्ये सत्ता असणाऱ्या आम आदमी पार्टीने आता पुण्यामधल्या निवडणुकीसाठी आपले निर्धारपत्र जाहीर करताना आप च्या उत्तम शाळा, आरोग्य सुविधा आणि मोफत बस प्रवास या पंजाब दिल्ली मॉडेलची आठवण करून दिली. याची ‘नक्कल नको, अस्सल आणा’ ‘गैरकारभाराकडून जबाबदार भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाकडे जाण्यासाठी बदल घडवूया’ असे आवाहन पुणेकरांना केले आहे. पुण्यामध्ये आम आदमी पार्टी चे ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील बहुतेक सर्व कार्यकर्ते हे सुशिक्षित युवक वर्गातील आहेत.

अनेक नागरी मुद्द्यांना हात घालणारे निर्धारपत्र आज आम आदमी पार्टी तर्फे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी पुण्यात पत्रकार भवन येथे जाहीर केले.

पुणेकरांसाठी आर्थिक संपन्नता देणारे म्हणजेच दरडोई उत्पन्न वाढवणारे रोजगार उपलब्ध करणारे आणि सुविधांच्या पुढे जात धोरणात्मक निर्णय घेतले जातील तसेच महिलांना मोफत बस प्रवास हा दिल्ली पंजाबच्या धर्तीवर दिला जाईल असे म्हटले आहे.

पुणेकरांसाठी कमाल 30 मिनिटात ऑफिस आणि तीस मिनिटात घरी परत अशी वेळेची, इंधनाची, मानसिक शारीरिक दमछाक थांबवणाऱ्या वाहतूक कोंडी मुक्त शहरासाठी मिसिंग लिंक रोड आधुनिक तंत्रज्ञान वापर केला जाईल.

सर्व सरकारी शाळा या उच्च दर्जाच्या सुविधा व माफक दरात शिक्षण देणाऱ्या, खाजगी शाळांच्या तोडीच्या बनवू.
पाचशे मीटर अंतरामध्ये मोफत प्राथमिक आरोग्य सुविधा देणारे मोहल्ला क्लिनिक तसेच महापालिका तुमच्या दारात या योजनेअंतर्गत नागरिकांना कागदपत्रे पारदर्शी पद्धतीने घरपोच दिले जातील.
प्रत्येक घराला पुरेसे पाणी व सामाविष्ट गावात मूलभूत सुविधांना प्राथमिकता देत रस्ते,पाणी यावर वाढीव निधी खर्च केला जाईल. प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावले उचलली जातील आणि भयमुक्त शहर होण्यासाठी विविध उपाय योजना राबवण्यात येतील असेही मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी पुणेकरांच्या समस्यांची यादी वाचत भाजप राष्ट्रवादी युतीवर टीका केली. नागरिकांच्या करातून जमा होणारा पैसा हा योग्य ठिकाणी, पारदर्शी पद्धतीने खर्च केला जाईल असे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, महिला अध्यक्ष सुरेखा भोसले, महासचिव अक्षय शिंदे, सुभाष कारंडे, सुनील सवदी आदी उपस्थित होते

निर्धारपत्र. मजकूर

ही निवडणूक बदलासाठी
अंधारातून उजेडाकडे

गैरकारभारातून जबाबदार भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाकडे,

असहायता,भीतीतून विश्वासाकडे,

त्रासातून दर्जेदार आनंदी जीवनाकडे,

शाश्वत विकासाच्या वाटेवरचे एक आधुनिक, सुसंस्कृत सुरक्षित शहर, पुणे शहर करण्यासाठी बदल हवा!


आप निर्धारपत्र

  1. पुणेकरांना आर्थिक संपन्नता देणारे, रोजगार उपलब्ध करणारे उद्योग क्षेत्र बनवण्याचा प्रयत्न, निव्वळ सुविधांच्यापुढे जात धोरणात्मक निर्णय. यासाठी जागतिक पातळीवरील काम करणाऱ्या तज्ञ मराठी मंडळींचा सहभाग घेतला जाईल. रोजगार निर्मिती व दरडोई उत्पन्न वाढीचे प्रयत्न.
  2. हिलांना मोफत बस प्रवास, इतरांना अल्प दरात मोफत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबुतीकरणासाठी उत्तम बसेस, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, सार्वजनिक पार्किंग सुविधा, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था.
  3. वाहतूककोंडीमुक्त स्मार्ट मोबिलिटी शहर, कमाल 30 मिनिटांत ऑफिस, 30 मिनिटांत घरी परत, वेळ, इंधन आणि पैशांची बचत, वाहतूक व्यवस्थेचे जीपीएस, रिअल टाइम ट्रॅकिंग, सिग्नल सुसूत्रीकरण, खड्डेमुक्त रस्ते
  4. सामान्य माणसाला परवडेल अशा पद्धतीची घरे. त्यासाठी नगरनियोजनामध्ये काही भविष्यामधील गरजा अनुरूप बदल. सार्वजनिक सुविधा परीपूर्णतेवरती अधिक भर. वस्तीतील नागरिकांचे न्यायपूर्ण पुनर्वसन.
  5. प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पाऊले प्रदूषणाच्या समस्येसंदर्भात अनेक बाबींमध्ये नियमावली तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी. सिमेंट मिक्सर प्लान्ट तसेच सांडपाणी पाण्याचा पुनर्वापर, कचरा नियोजन याचे कठोर नियोजन. रात्रीचे फटाके, लाउड स्पीकरवर कडक नियंत्रण.
  6. सर्व सरकारी शाळा उच्च दर्जाच्या सुविधायुक्त. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याला प्राथमिक व उच्च शैक्षणिक सुविधा या आधुनिक व माफक दरात. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक बाबींवरील अर्थसंकल्प वाढीव तरतूद.
  7. नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्य सुविधा यासाठी नजीकच्या अंतरामध्ये मोहल्ला क्लिनिक ही दिल्ली पंजाबच्या धर्तीवर योजना राबवली जाईल. आरोग्यावरील वाढीव अर्थसंकल्प तरतूद. डिजिटल हेल्थ डेटा व्यवस्थापन.
  8. भयमुक्त पुणेकर यासाठी सर्व ठिकाणी सीसीटीव्ही, सार्वजनिक ठिकाणी महिला मार्शल, गुंडगिरी,दहशत, कोयता गँगच्या मुसक्या आवळणार. बेकायदेशीर नशा, ड्रग्स विरोधात मोहीम.
  9. प्रत्येक घराला पुरेसे पाणी शाश्वत पाणी व्यवस्थापन. शास्त्रीय कचरा संकलन व प्रक्रिया, स्वच्छ रस्ते, स्वच्छ वस्ती, टंकर मुक्त पाणी नियोजन
  10. महापालिका तुमच्या दारात नागरिकांना कागदपत्रे पारदर्शी पद्धतीने, वेळेत, घरपोच सुविधा. जेष्ठ नागरिक,महिलांच्या पालिकेतील चकरा वाचवणार
  11. भ्रष्टाचार, टक्केवारी मुक्त कारभार महापालिकेच्या टेंडर कामांमध्ये बऱ्याचदा प्रशासन आणि राजकीय नेते हातमिळवणी करत भ्रष्टाचार करतात तसेच कामाचा दर्जा खालावतो. जनतेच्या पैशाची उधळपट्टी होते. हे दृष्टचक्र संपवण्याचा आप प्रयत्न करेल.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदींनी ओमानवरील हल्ल्याचा निषेध केला:8 आखाती देशांशी चर्चा, दुबई आणि अबू धाबीहून 2000+ भारतीय परतले

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी भारतीय समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणशी चर्चा करणार:मध्य पूर्वेतील देशांवरील हल्ले रोखणे हे उद्दिष्ट

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इराणशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी...

२८ आणि २९ मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

चौथ्या विजेतेपदासाठी भाग्यश्री फंड उत्सुक ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक...

चंद्रकांतदादा पाटील यांची सीआयएसएफच्या जवानांसोबत होळी साजरी

जवानांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरुन आले-...