सर्वसमावेशक विकासाचेच धोरण:आबा बागुल
नगरविकास विभागामार्फत भरघोस निधी होणार उपलब्ध
पुणे : प्रभाग क्रमांक ३६ साठी सर्वांगीण विकासाचे व्हिजन हे पायाभूत सुविधाबरोबरच नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे.विशेष म्हणजे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या ज्या योजना मी या व्हिजनमधून मांडल्या आहेत.त्या पूर्ण करण्यासाठी नगरविकास विभागामार्फत भरघोस निधी उपलब्ध करून देणार आहेत.त्यासाठी ते स्वतः लक्ष घालणार आहेत.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी ३०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दर्जेदार व आधुनिक शिक्षण सुविधा वाढविण्यासाठी राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या धर्तीवर नवीन शाळा, अत्याधुनिक इंजिनिअरिंग कॉलेज आणि
प्रभाग व शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टीधारकांना स्वयंपुनर्विकासातून हक्काची घरे , शाहू वसाहतीच्या एसआरए प्रकल्पाला दिलेली स्थगिती कायम ठेवून तेथील रहिवाशांना स्वयंपुनर्विकासाची मुभा निश्चितच मिळणार आहे.हे लोकोपयोगी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.त्यासाठी शिवसेनेला भरभरून मतदान करण्याचे आवाहनही आबा बागुल यांनी केले.

