मतदारांना पैश्यांचे प्रलोभन दाखवुन मत मागणा-या तीन इसमांवर कारवाई
पुणे महानगरपालीका सार्वत्रिक निवडणुक 2025-26 अनुषंगाने बाणेर पोलीस स्टेशन हददीमध्ये मतदारांना स्वतःच्या पक्षाच्या उमेद्वारांना मत देण्यासाठी पैसे वाटणा-या तीन इसमावर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे.
दि.०९/०१/२०२६ रोजी दरम्यान रोहीत लक्ष्मण उत्तेकर यांचे द 96 के ऑटो केअर गॅरेज लक्ष्मी माता मंदिराच्या जवळ बालेवाडी पुणे या ठिकाणी प्रभाग क्र 09 मधील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे उमेद्वारांना मत देण्यासाठी दोन इसम मतदारांना पैसे वाटत असल्याची बातमी सोशल मिडीयाच्या माध्यमाने बाणेर पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत यांना प्राप्त झाली होती. सदरच्या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता इसम नामे गणेश सुनिल लिंगायत, वय-24 वर्षे, रा- वालेवाडी पुणे हा त्याच्या ताब्यात वरिल कारणास्तव रक्कम आणि प्रचार साहीत्य घेवुन मिळुन आला. त्याच्या ताब्यातील इसम नामे ऋषिकेश भगवान बालवडकर, रा लक्ष्मी माता मंदिराच्या पुढे बाणेर बालेवाडी रोड बालेवाडी पुणे याच्या मालकीच्या एका मोपेड दुचाकीमधुन एकुण 1,50,000/- रुपये रोख रक्कम आणि प्रचार साहीत्य तसेच सदर ठिकाणच्या मतदारांची हस्तलिखीत यादी मिळुन आली. सदर दुचाकी मालक ऋषिकेश भगवान बालवडकर याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या राहत्या घरामधुन देखील एकुण 1,03050/- रुपये रोख रक्कम मिळुन आली.
सदरची रक्कम त्यांनी प्रभाग क्र 09 मधील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे उमेद्वारांना मत देण्यासाठी बालेवाडी परिसरातील मतदार यांना वाटप करण्यासाठी आणली असल्याचे निष्पन्न झाल्याने, सदरची एकुण 2,63,050/-एवढी रोख रक्कम भरारी पथक च्या मदतीने बाणेर पोलीसांनी जप्त करुन इसम नामे गणेश सुनिल लिगायत, वय 24 वर्षे, रा बालेवाडी पुणे व ऋशिकेश भगवान बालवडकर, रा.लक्ष्मी माता मंदिराच्या पुढे बाणेर बालेवाडी रोड बालेवाडी पुणे यांच्यावर तसेच सदर कार्यासाठी त्यांना गॅरेज खुले करुन देणारे गॅरेज मालक नामे रोहीत लक्ष्मण उत्तेकर यांच्यावर बाणेर पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा रजि नं 19/2026 भारतीय न्याय संहीता कलम 170,173 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परि-४ पुणे शहर श्री. चिलुमुला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर श्री. विठ्ठल दबडे यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अलका सरग, सपोनि स्वाती लामखेडे, सपोनि कैलास डाबेराव, पोउनि सुप्रिया मांढरे, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, अतुल भिंगारदिवे, प्रितम निकाळजे, गजानन अवातिरक, विकास भोरे, दत्ता काळे, रमेश क्षिरसागर सर्व नेमणुकबाणेर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे.
बालेवाडी: राष्ट्रवादीच्या उमेदवाराना मते मिळावीत म्हणून मतदारांना वाटपासाठी आणलेले 2 लाख 63 हजार जप्त
Date:

