पुणे- केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवार पेठ-नानापेठ या प्रभाग क्रमांक २३ मध्ये भारतीय जनता पार्टी-आरपीआय (A) च्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज प्रचार दौरा करत भारतीय जनता पार्टीला मतदानरुपी आशीर्वाद देण्याचं आवाहन केलं. यावेळी प्रचार फेरीदरम्यान विविध समाजघटकांनी उत्स्फूर्तपणे केलेलं स्वागत त्यांनी स्विकारलं. यावेळी आमदार सुनील कांबळे आणि आमदार हेमंत रासने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा-आरपीआय (A) चे प्रभाग २३ चे उमेदवार विशाल धनवडे, पल्लवी चंद्रशेखर जावळे, अनुराधा संजीव मंचे, ऋतुजा तेजस गडाळे या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन केलं.
चाचा हलवाई येथून सुरु झालेल्या या प्रचारफेरीची सोन्या मारुती चौक, फडके हौद, लाल महल, फरासखाना चौक, पासोड्या विठोबा, चोळखण अळी, विजय मारुती चौक, शुक्रवारपेठ चौक, गवरी आळी, नरहरी चौक, दुर्जंसिंग पागा, शिवरामदादा तालीम, गोविंद हलवाई चौक मार्गे सांगता झाली.

