पुणे : सक्रिय राजकारणात पदार्पण करून गणेश बिडकर यांना २५ वर्षे पूर्ण झाली. महापालिकेत नगरसेवक ते सभागृहनेता अशी पदे भूषवूनही त्यांनी नेहमी सामान्य कार्यकर्ता हीच ओळख जपली आहे.प्रभागातील कोणतेही काम असो, नागरिकांनी आवाज दिला की ते आपल्या घरातील सदस्याप्रमाणे लगेच धावून जातात. त्यामुळे वडिलांपासून जपलेली नात्यांची नाळ आजही भक्कम आहे. त्यांच्या या साधेपणामुळेच आपला माणूस म्हणून प्रभागात त्यांची ओळख असून तीच शिदोरी त्यांना पाठिंबा मिळवून देत आहे.
प्रभाग २४ (कसबा पेठ परिसर) मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले बिडकर २००२ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. दुसऱ्या टर्मनंतर २०११-१२ मध्ये स्थायी समिती अध्यक्षपद मिळाले. महापालिकेत सत्ता नसतानाही मुत्सद्दीपणामुळे पद मिळून प्रभागातील विकासाला गती दिली.या काळात श्री नागेश्वर आणि त्रिशुंड गणपती मंदिराचा जीर्णोद्धार, कमला नेहरू रुग्णालयाच्या कामांना गती दिली. नागरिकांचा प्रशासनाशी संवाद साधणारा दुवा म्हणून सातत्याने निधी मिळवून प्रभागातील कामे मार्गी लावली.मेट्रो, ‘जायका’ प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली. २०२०-२२ दरम्यान सभागृहनेता म्हणून चोवीस तास पाणीपुरवठा, नदी पुनरुज्जीवन, कचरा व्यवस्थापन, मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांना गती दिली. समाजाशी असलेली बांधिलकी, विकासाचा असलेला ध्यास आणि पक्षाशी असलेली एकनिष्ठा यामुळेच त्यांना तिसऱ्या टर्ममध्ये गटनेतेपद पक्षाने बहाल केले होते.


