पुणे महानगरपालिकेच्या स्व. पु.ल. देशपांडे उद्यान (पुणे ओकायामा मैत्री उद्यान) निर्मितीस दोन दशक पूर्ण झाल्याबाबत ओकायामा शिष्टमंडळ जपान यांनी दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता उद्यानास सदिच्छा भेट दिली. या वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल)श्रीमती पवनीत कौर,ओकायामा जपानचे शिष्टमंडळ उपस्थित होते. ओकायामा शिष्टमंडळ, असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपानचे प्रतिनिधी व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत उद्यानामध्ये केक कापून उद्यानाची द्वीदशकपूर्ती साजरी करण्यात आली. तसेच महापलिका आयुक्त तथा प्रशासक, पुणे महानगरपालिका यांच्या दालनात ओकायामा शिष्टमंडळामधील सर्व प्रतिनिधींचे महापलिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी श्रीमती पवनीत कौर,अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, नगर सचिव योगिता भोसले,सह महापालिका आयुक्त डॉ. अशोक घोरपडे, व समीर खळे, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान उपस्थित होते.


