पुणे- पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग 22 मधील अखिल भारतीय काँग्रेस – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे ,अविनाश बागवे ,रफीक शेख व दिलशाद शेख या उमेदवारांचे आज हरकानगर वसाहती मध्ये अतिशय उत्साहात व उमेदवारांना पुष्पहार अर्पण करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले .पदयात्रेची सुरुवात गोगादेव यांच्या मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. या पदयात्रेत स्थानिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या .
प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांना भेट देत त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेण्यात आल्या .यावेळी हरकनगर येथे महिलांना बचत गटाच्या व मुक्ता फाउंडेशन च्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचं आश्वासन यावेळी इंदिरा अविनाश बागवे यांनी महिलांना दिले .प्रत्यक्ष महिलांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या व त्या आपण यशस्वीरीत्या सोडवू असे त्यांनी सांगितले .
आज निघालेल्या पदयात्रेत
जुबेरबाबू शेख, चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, वीरेंद्र घोसरे, मनीष तांदरे, दयानंद अडागळे, यासर बागवे, मधुकर चांदणे, मारुती कसबे, शफीक शेख, दिपक गायकवाड, फारुक बागवान जावेद शेख व इतर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व मित्रपक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .


