पुणे – पुणे शहरात झोपडपट्ट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे .आपल्या काशेवाडी-डायस प्लॉट भागात ही झोपडपट्टीधारकांची संख्या मोठी आहे .येत्या काळात झोपडपट्टी वासियांच्या शिक्षण ,आरोग्य आणि मूलभूत सोयीसुविधांसाठी विशेष काम करणार असल्याचे प्रभाग २२ ड चे उमेदवार अविनाश रमेश बागवे यांनी सांगितले .आज प्रचारानिमित्त ते लोहियानगर भागातील वसाहतीत पदयात्रे द्वारे प्रचारासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते . काशेवाडी-डायस प्लॉट प्रभागातील अखिल भारतीय काँग्रेस व शिवसेना (ठाकरे ) पक्षाचे अधिकृत उमेदवार इंदिरा बागवे ,अविनाश बागवे ,रफिक शेख ,दिलशाद शेख यांना लोहियानगर वसाहतीतील महिलांनी अतिशय उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला .ठिकठिकाणी ज्येष्ठ महिला अतिशय प्रेमाने आशीर्वाद देताना दिसत होते .तर महिला या पदयात्रेत मोठ्या
संख्येने होत होते .ठिकठिकाणी महिला काँग्रेस पक्षाच्या आणि उमेदवारांच्या घोषणा जोरदार पणे देत होत्या .
या पदयात्रेत माजी राज्यमंत्री रमेशदादा बागवे, मधुकर चांदणे, पप्पू माने, यासर बागवे, दयानंद अडागळे, विजय खेडेकर, राजू भरगुडे, शफीक शेख, बाळू कसबे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते

