पुणे- अजित पवार गट आणि शरद पवार गट यांची संयुक्त आघाडी असताना ज्या उमेदवारांनी अधिकृत उमेदवार जाहीर केल्यावरही ,पक्षाने आदेश दिल्यावरही उमेदवारी अर्ज माघारी घटले नाहीत अशांवर कारवाई करायला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुरुवात केली आहे. राज्यात होत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे समवेत आपण संयुक्त आघाडी केलेली आहे. या संयुक्त आघाडीचे घडयाळ चिन्हावरील अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक २७ नवीपेठ पर्वती मध्ये
श्री. धनराज विष्णु जाधवश्रीमती. अक्षता जयराज लांडगे, दिपाली अभिजीत बारवकर,अशोक हरणावळहे चारही उमेदवार संयुक्त आघाडीचे असल्याने आपण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा देत आहे.असे शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रभाग क्र. २७ नवीपेठ पर्वती मधून गट अ.श्री. दिलीप शंकर अरुंदेकर, गट क. श्री. अक्षदा प्रेमराज गदादे, गट ड. श्री. अनिकेत उर्फ राकेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली होती. परंतू दोन्ही पक्षांची संयुक्त आघाडी झाल्यामुळे आपल्या पक्षाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितले असता त्यांनी माघार घेतली नसून पक्षशिस्त भंग केला असल्याने त्यांचेवर पक्षामार्फत पक्षशिस्त भंगाची कारवाई करण्यात येत आहे.पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करून आपण सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपरोक्त नमूद घडयाळ चिन्हावरील चारही उमेदवारांना मदत करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे.असे पत्र शशिकांत शिंदे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. या शिवाय प्रभाग क्रमांक १६ हडपसरगाव, सातववाडी येथे या संयुक्त आघाडीचे घडयाळ चिन्हावरील अधिकृत उमेदवारसौ. वैशाली सुनिल बनकर,सौ. वर्षा प्रशांत पवार,कमलेश आबा कापरे, योगेश दत्तात्रय ससाणे हे असल्याने आपण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा देत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रभाग क्र. १६ हडपसरगाव, सातववाडी मधून सौ. भाग्यश्री विक्रम जाधव व श्री. अविनाश काळे यांना उमेदवारी दिली होती. परंतू दोन्ही पक्षांची संयुक्त आघाडी असल्यामुळे आपल्या पक्षाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितले असता त्यांनी माघार घेतली नसून पक्षशिस्त भंग केला असल्याने त्यांचेवर पक्षामार्फत पक्षशिस्त भंगाची कारवाई करण्यात येत आहे.
पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करून आपण सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपरोक्त नमूद घडयाळ चिन्हावरील चारही उमेदवारांना मदत करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. सेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
बंडखोर उमेदवारांवर शरद पवार गटाची तातडीने कारवाई
Date:

