पुणे -क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे निमित्त साधत फुले वाड्यातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करीत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांचे काशेवाडी- डायस प्लॉट चे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे ,अविनाश बागवे ,रफिक शेख व दिलशाद शेख यांच्या प्रचाराचा शुभारंभ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंततीदिनी फुले वाडा येथून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली .
फुले दांपत्यांचा विचार समाजाला ऊर्जा देणारा असल्याचे मत कांग्रेस पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी यावेळी म्हणाले .महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी अतिशय मोलाचे योगदान दिले .त्यांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे आज काळाची गरज बनली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले .याप्रसंगी जुबेरबाबू शेख, विठ्ठल थोरात, तारक शेख, राजू शेख, पप्पू परदेशी, जावेद शेख, आरिफ शेख, उफक शेख, समिर शेख, सुरेखा खंडाळे, दीपक गायकवाड, सुरेश व्यास, सुंदरम , अरुण गायकवाड यासह पुणे शहरातील कांग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते .
फुले दाम्पत्यांचा विचार समाजाला ऊर्जा देणारा — रमेश बागवे
Date:

