पुणे- पुण्यातील राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने आम आदमी पार्टीने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करतबाजी मारली आहे. या यादीत एकूण 25 उमेदवारांचा समावेश असून, येत्या काळात आणखी उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळवण्यासाठी मुलाखती, अर्ज, केलेल्या कामांचा आढावा आणि मतदारसंघातील जनसंपर्क यासारख्या निकषांवर कसोटी लावली जात आहे. अशा वातावरणात पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आम आदमी पार्टीनेही अधिकृतपणे उडी घेतली आहे.

आम आदमी पार्टीकडून जाहीर करण्यात आलेली ही पहिली यादी पुणे महापालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. पक्षाने शहरातील विविध भागांतील कार्यकर्ते, सामाजिक कार्यात सक्रिय असलेले चेहरे आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या उमेदवारांना संधी दिल्याची माहिती समोर येत आहे. आप पुणे महानगरपालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत या पहिल्या यादीतून मिळत आहेत. त्यामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये आम आदमी पार्टी ‘तिसरा पर्याय’ म्हणून समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करताना आम आदमी पार्टीने पारदर्शक प्रशासन, नागरिककेंद्रित विकास, पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले आहेत. पक्षाकडून उमेदवारी देताना केवळ राजकीय अनुभव नव्हे, तर जनतेशी थेट संपर्क, स्थानिक पातळीवरील काम आणि प्रामाणिक प्रतिमा यांना प्राधान्य देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. पुण्यातील महापालिका निवडणूक ही केवळ सत्तेसाठी नव्हे, तर शहराच्या विकासदिशेसाठी असल्याचे पक्षनेत्यांचे मत आहे.

दरम्यान, राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षांनी उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. मोठे पक्ष जिथे आघाड्या, युती आणि जागावाटपात अडकलेले दिसत आहेत, तिथे आम आदमी पार्टीने आधीच उमेदवारांची यादी जाहीर करून प्रचाराची तयारी सुरू केली आहे. आगामी काळात आपकडून दुसरी आणि तिसरी यादीही जाहीर होण्याची शक्यता असून, पुणे महापालिका निवडणुकीत पक्ष कितपत प्रभाव टाकतो,
पुणे महानगरपालिका 2025–26 निवडणूक अनुषंगाने आम आदमी पार्टीच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी
सौ शितल कांडेलकर प्रभाग 3 (अ) ओबीसी महिला
श्री संतोष काळे: प्रभाग 5 (अ) ओबीसी सर्वसाधारण
सौ श्रद्धा शेट्टी :- प्रभाग 6 (अ) अनुसूचित जाती
श्री शंकर थोरात: प्रभाग 7 (ड) सर्वसाधारण
श्री विकास चव्हाण: प्रभाग 8 (अ) अनुसूचित जाती
अँन अनिस :- प्रभाग 8 (क) सर्वसाधारण महिला
श्री सुदर्शन जगदाळे :- प्रभाग 9 (ड) सर्वसाधारण
सौ आरती करंजावणे: प्रभाग 10 सर्वसाधारण महिला
अँड. कृणाल घारे :- प्रभाग 10 (ड) सर्वसाधारण
अँड. दत्तात्रय भांगे: प्रभाग 11 (ड) सर्वसाधारण
श्री समीर आरवडेः प्रभाग 19 (क) सर्वसाधारण
सौ मधू किरण कांबळे :- प्रभाग 22 (अ) अनुसूचित जाती महिला
श्री उमेश बागडेः- प्रभाग 23 (क) अनुसूचित जाती
सौ विजया किरण कद्रे: प्रभाग 23 (ब) ओबीसी महिला
श्री निरंजन अडागळे : प्रभाग 26 (अ) अनुसूचित जाती
श्री अनिल कोंढाळकरः प्रभाग 27 (ड) सर्वसाधारण
अँड अमोल काळे: प्रभाग 31 (ड) सर्वसाधारण
श्री निलेश वांजळे प्रभाग 32 (ड) सर्वसाधारण
श्रीमती सुरेखा भोसले: प्रभाग 32 (क) सर्वसाधारण महिला
श्री रमेश मते :- प्रभाग 33 (ड) सर्वसाधारण
श्री धनंजय बेनकर प्रभाग 34 (अ) ओबीसी सर्वसाधारण
श्री कुमार धोंगडे प्रभाग 39 (ड) सर्वसाधारण
श्री गजानन भोसले: प्रभाग 40 (ड) सर्वसाधारण
सौ प्रिया निलेश कांबळे : प्रभाग 14 (अ) अनुसूचित जाती महिला
श्री प्रशांत कांबळे : प्रभाग 38 (इ) सर्वसाधारण

