अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी संपन्न झाला आहे. मोदींनी मंदिराच्या गर्भगृहात पोहोचून प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प केला. त्यानंतर पूजा सुरू केली. पंतप्रधानांनीच रामलल्लाच्या डोळ्यांवरील पट्टी काढून हातात कमळ देऊन त्यांची पूजा केली. .तत्पूर्वी आज सकाळी रामलल्लाला मंत्रोच्चाराने जागे करण्यात आले. यानंतर वैदिक मंत्रोच्चारांनी प्रार्थना झाली. दहा वाजल्यापासून शंखांसह ५० हून अधिक वाद्यांच्या मंगलमय आवाजात प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरुवात झाली. दुपारी 12.29 वाजता प्राणप्रतिष्ठेचा मुख्य विधी सुरू झाला. 84 सेकंदात मूर्तीमध्ये प्राण स्थापना झाली.रामलल्ला पितांबराने शोभून आहेत. त्यांच्या हातात धनुष्यबाण आहे
यानिमित्त देश-विदेशातील अनेक पाहुणे आले आहेत. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुकेश-नीता अंबानी, गौतम अदानी, अमिताभ बच्चन, रजनीकांत यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.25 वाजता अयोध्येला पोहोचले. दुसरीकडे, लालकृष्ण अडवाणी अयोध्येला जाणार नाहीत. आरतीच्या वेळी सर्व पाहुणे घंटा वाजवतील. लष्कराच्या हेलिकॉप्टरने अयोध्येत पुष्पवृष्टी केली.
सोमवारी सकाळी मंगल ध्वनीने सोहळ्याची सुरुवात झाली. सकाळी 10 वाजेपासून 177 राज्यांतील 50 वाद्ये वाजवली गेली.