पुणे, दि.30: भोर येथील मयूर संपत खुंटे वय १९ या तरुणाने केलेल्या आत्महत्त्या प्रकरणी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयास प्राप्त झालेल्या अहवालानुसार भोर पोलीस स्टेशनमध्ये सदस्य सचिव जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती तथा सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी आणि गट विकास अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांचे समवेत रविवारी भेट दिली.

भोर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा क्रमाक १७८/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घडलेल्या घटनेबाबतची माहिती घेतली तसेच पिडीत व्यक्तीच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केले. अॅट्रोसिटी कायद्यानुसार आवश्यक ती सर्व मदत तात्काळ करण्याबाबत आश्वासन देण्यात आले.
या प्रकरणी केससाठी विशेष वकीलाची नियुक्ती करण्याकरिता उपविभागीय अधिकारी, भोर विभाग, सासवड यांना जिल्हास्तरीय समितीमार्फत निर्देश देण्यात येतील, पोलीस विभागानेही कोणताही भेदभाव न करता, कोणत्याही गोष्टीला बळी न पडता योग्य पध्दतीने पारदर्शक पद्धतीने तपास करुन पिडीत व्यक्तीना न्याय द्यावा, असे श्री. लोंढे पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत.

