पुणे-परिवहन विभाग महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण राज्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना १५ जानेवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ संपन्न होत आहे.राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंगस्कूलमधील जे शालेय विद्यार्थी आई वडिलांबरोबर दु चाकी वर बसून अश्या ८ वर्षा खालील ६०० विद्यार्थ्यांना आज वाटप करण्यात आले. हे हेल्मेट मुलांसाठी खास हिरो मोटो क्रॉप कंपनी यांच्या वतीने तयार करण्यात आले आहेत. हे हेल्मेट आयएसआय मार्कचे हेल्मेट असून ते वॉटर प्रूफ, इअर सेफ्टी अशी या हेल्मेटची वैशिष्टे आहेत. या ६०० विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचे उपयोग, फायदे व मोटार वाहन कायद्यामधील तरतुदी याचे मागदर्शन रस्ता सुरक्षा अभ्यासक व निवृत्त अधिकारी अनिल पंतोजी यांनी विस्तृत माहिती दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तद्नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आहे. शाळेच्या वतीने प्रास्ताविक प्रिन्सिपल जामुवंत मसलकर यांनी केले. सदर हेल्मेट वाटप कार्यक्रम बाबतचे प्रयोजन राजू घाटोळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य जितेंद्र पाटील होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी उपमहापौरआबा बागुल रणबीर तलवार कार्यकारी संचालक इंडियन हेड इन्जुरी फौंडेशन नवी दिल्ली, गीता ठाकूर समन्वयक इंडियन हेड इन्जुरी फौंडेशन नवी दिल्ली, दिलीप कुमार पांडा अध्यक्ष सेफ इंडिया ओरिसा तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत संजीव भोर प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे, अनिल वळीव रस्ता सुरक्षा विभाग परिवहन आयुक्त कार्यालय, मुम्बई व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे, युवा नेते अमित बागुल, तसेच शाळेच्या प्रिन्सिपल रुपाली कदम व वाईस प्रिन्सिपल अश्विनी ताठे उपस्थित होते.
यावेळी पुण्यनगरीचे माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, रस्त्यावर सुरक्षित प्रवास करणे सर्वांची जबाबदारी आहे. हे चिमुकल्यांना या वयातच हेल्मेटचे महत्व कळल्यास ते प्रत्येकवेळी दुचाकीवर जाताना आई-वडिलांना सक्तीने हेल्मेट घाल्यास सांगतील व यातूनच जागृती होईल त्यामुळे सर्व शाळेच्या माध्यमातून हेल्मेटचे महत्व घरोघरी पोहचवणे आहे. यासाठी शासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे.
यावेळी अतिरिक्त परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य जितेंद्र पाटील म्हणाले की, मुंबईच्या तुलनेत अपघातात हेल्मेट न वापरल्यामुळे दगवानार्यांची संख्या पुणे शहरात जास्त आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. यामुळे शहरात विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. पुणेकरांनी स्वयंपूर्तीने हेल्मेटचा वापर करण्याचे आव्हान यावेळी त्यांनी केले.
सदर कार्यक्रमाला विलास आपटे, निलेश गांगुर्डे,सुरज देवकर, ओमकार जाधव, गणेश बाजारे, पंढरीनाथ बुरघाटे, अनुज शिंदे, रुपाली बोरकर संतोष बोरकर, निलेश रेणुसे, मनोज कोंडेकर, अमेंय आपटे, भरत गायकवाड मोटार ड्रायविंग स्कूल ओनर असो महाराष्ट्र राज्य चे संचालक उपस्थित होते. मोटर वाहन निरीक्षक रेहमा मुल्ला यांनी रस्ता सुरक्षा विषयक प्रतिज्ञा पालक व विद्यार्थ्यांना दिले. सूत्रसंचालन शाहीद जमादार यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप दुरगुडे यांनी केले.