उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अक्कलकोट येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन

Date:

मल्लिकार्जुन मंदिरच्या कामासाठी २ कोटींचा निधी तर नवीन बस स्थानकाच्या विकासासाठी २९ कोटींचा निधी मंजूर

अक्कलकोट, दिनांक 19 :- राज्य शासनाकडून अक्कलकोट येथील मल्लिकार्जुन मंदिराच्या जिर्णोद्वार कामासाठी 2 कोटींचा निधी तर नवीन बस स्थानकाच्या विकासासाठी 29 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, सर्वश्री आमदार सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, सुभाष देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवानंद पाटील, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक विनोद भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी श्री. पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

अक्कलकोट शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराचे काम 18 महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देवस्थान समितीने ठेवले आहे. मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे दक्षिणात्य शैलीचे असणार आहे. यासाठी राज्याच्या पर्यटन विकास विभागाकडून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या अंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित 2 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. या मंदिराचे पूर्ण बांधकाम रेखीव दगडातून केले जाणार आहे.

अक्कलकोट येथील नूतन बस स्थानकासाठी 29 कोटी रुपये निधी मंजूर असून एसटी बसने श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी व नागरिकांसाठी बसस्थानकात सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, सुसज्ज प्लॅटफॉर्म, आसन व्यवस्था, हिरकणी कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कौशल्य विकासाचे नवीन युग: मंत्री  चंद्रकांतदादा पाटील

फ्युएल-एनएसई बेल रिंगिंग सोहळ्यात 'कमवा आणि शिका' मुलींसाठी विद्यावेतन...

अग्रय या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी चौथ्या जहाजाचे नौदलाकडे हस्तांतरण

नवी दिल्‍ली- कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स(जीआरएसई)ने स्वदेशी आरेखन...

जगातील सर्वात मोठी जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिला टप्पा एक एप्रिल 2026 पासून होणार सुरू

देशभरातील जनगणतेत 30 लाखांहून अधिक जनगणना कर्मचारी, पर्यवेक्षक आणि...

वापरून झालेल्या बॅटरी साहित्याचा पुनर्वापर करण्यात शास्त्रज्ञांना यश

नवी दिल्‍ली- वापरानंतर क्षमता संपलेल्या लिथियम-आयन बॅटऱ्यांपासून मिळवलेल्या स्पेंट ग्रॅफाईटच्या...