लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिरावरील प्रभू श्रीरामलल्लांच्या २१ फुटी प्रतिमेचे अनावरण 

Date:

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट : रास्ते राम मंदिराचे प्रमुख विश्वस्त सरदार कुमारराजे रास्ते यांच्या हस्ते अनावरण
पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने अयोध्या येथील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त गुरूवारी तब्बल २१ फूटी प्रभू श्रीरामलल्लांची प्रतिमा बुधवार पेठेतील मंदिरावर विराजमान करण्यात आली आहे. प्रतिमेला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे.

या प्रतिमेचे अनावरण रास्ते राम मंदिराचे प्रमुख विश्वस्त सरदार कुमारराजे रास्ते यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरात पाच दिवस रामरक्षा पठण तसेच विविध कार्यक्रम होणार आहेत. प्रतिष्ठपनेच्या दिवशी सोमवारी सकाळी सुनिल देवधर यांचे हस्ते मंदिरात श्री दत्त याग संपन्न होणार आहे. तसेच दुपारी अनाथ मुलांना उबदार स्वेटर व सुग्रास भोजन देखील देण्यात येणार आहे. मंदिरात दिवसभर भाविकांना मिष्ठान्न प्रसादाचे नियोजन केले आहे.

यावेळी मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला फरासखाना पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस आयुक्त रुक्मिनी गलांडे,  हिमालयात तपस्या केलेले स्वामी पुरुषोत्तम आनंद सरस्वती उर्फ भिडेस्वामी, माधवराजे रास्ते तसेच मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागीरदार, विश्वस्त महेंद्र पिसाळ, राजू बलकवडे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दत्त महाराजांच्या आरती देखील झाली. या सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने  सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच पुढील पाच दिवस मंदिरात एक लक्ष श्रीराम नाम जप संकल्पामध्ये योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

VIT च्या विद्यार्थ्यांकडून ‘स्पंदन’ उपक्रमांतर्गत सिंहगड गडसंवर्धन व खडकवासला स्वच्छता मोहीम

पुणे-—विष्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) च्या सोशल वेलफेअर डेव्हलपमेंट...

विशेष डिजिटल शेती शाळेचे एप्रिल महिन्यात आयोजन

पुणे, दि.३०: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी...

भाजपा महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण’; शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या: हर्षवर्धन सपकाळ

फडणवीस सरकारकडून महाराष्ट्रधर्म व संविधानांच्या मुल्यांची पायमल्ली; गोलवलकरांचे ‘बंच...