महिला बचत गट खाद्य महोत्सव प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे विक्रम कुमारांनी केले उद्घाटन

Date:

पुणे- महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत महिला बचत गट खाद्य महोत्सव प्रदर्शन व विक्रीचे आयोजन आज दि. १९/१/२०२४ ते दि. २१/१/२०२४ या कालावधी मध्ये करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त . विक्रम कुमार, हस्ते पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, पुणे येथे सपंन्न झाले. यावेळी उद्घाटन प्रसंगी महापालिका आयुक्त यांनी पुणे शहरात विविध वस्तू उत्पादीत करणारे ६००० महिला बचत गट असल्याचे सांगून पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत राबविणेत येत असलेल्या विविध महिला सक्षमीकरण योजनांबद्दल माहिती दिली. पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील ठराविक रक्कम महिलांच्या सक्षमीकरणासाठी वापरणे बंधनकारक असलेचे त्यांनी नमूद करून या योजनांचा लाभ सर्व महिला वर्गांनी घेणेबाबत तसेच पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित करणेत येत असलेल्या विविध प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घेणेबावत आव्हान केले. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. श्री. कुणाल खेमनार यांनी महिला सक्षमीकरणअंतर्गत महिला बचत गटांकरीता येत्या काळामध्ये डिजिटल मार्केटींगचे नियोजन इ- कॉमर्स चे वेगवेगळे प्लॅटफॉर्म व मोबाईल अॅप्लिकेशन यांचे माध्यमातून करणेत येणार असल्याचे नमूद केले व यामध्ये जास्ती जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले. या कार्यक्रम प्रसंगी परिमंडळ क्र. ३ चे उप आयुक्त श्रीमती आशा राऊत, उद्यान विभाग प्रमुख अशोक घोरपडे, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, समाज विकास विभागाचे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, तसेच समाज विकास विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.उप आयुक्त नितिन उदास, यांनी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना केली. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन संदीप कोळपे सहा. समाज विकास विभाग यांनी केले तर आभार प्रदर्शन रामदास चव्हाण, मुख्य समाज विकास अधिकारी यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...