Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सतर्फे ‘अॅक्टिव्ह वन’ चे अनावरण

Date:

~१००% आरोग्य आणि १००% आरोग्य विमा देणारी एक सरलीकृत आणि व्यापक आरोग्य विमा उपायसुविधा~

पुणे२०  जानेवारी २०२४: आदित्य बिर्ला कॅपिटलची आरोग्य विमा शाखा आणि भारतातील आघाडीचे वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा पुरवठादार आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“ABHICL”) ने ‘अॅक्टिव्ह वन’ ही एक सरलीकृत आणि सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना सादर करण्याची घोषणा केली. ही योजना पॉलिसीधारकांना केवळ त्यांच्या आरोग्य विम्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर त्यांना स्वतःला आरोग्यसंपन्न बनविण्यासही सक्षम करते.

१००% हेल्थ रिटर्न्स™, क्लेम प्रोटेक्ट, कोणतीही उप-मर्यादा नाही, सुपर रीलोड आणि सुपर क्रेडिट यासारख्या उद्योगातील आघाडीच्या वैशिष्ट्यांसह परिपूर्ण ‘अॅक्टिव्ह वन’ हे ABHICL चे सर्वात व्यापक उत्पादन आहे, जे ग्राहकांना त्यांच्या आरोग्य हमी आणि त्यांच्या आरोग्य विम्याच्या गरजांसाठी वन स्टॉप सोल्यूशन सादर करते.

सादरीकरणाबद्दल भाष्य करताना आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मयंक बथवाल म्हणाले, “अॅक्टिव्ह वन हे आमचे ग्राहक, सल्लागार, वितरक आणि भागीदार यांची इच्छापूर्ती करण्यात आम्ही चांगले आहोत याचा परिणाम आहे. त्यांच्या इनपुट आणि माहितीच्या आधारे, आम्ही अॅक्टिव्ह वन विकसित केला असून तो प्रत्येक ग्राहकाच्या त्यांच्या आरोग्याच्या किंवा जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि जुनाट आजारांशी लढण्याच्या टप्प्यांवर गरजा पूर्ण करतो. एकाच उत्पादनात सात प्रकारांसह, आम्ही सर्वांसाठी पॉवर ऑफ वन सादर करत आहोत. ABHI येथे, आमचा दृष्टीकोन नेहमीच निरोगीपणाला प्रोत्साहन देणे, विमाधारकांना निरोगी जीवनशैली आणि सर्वांगीण स्वास्थ्य अंगिकारण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आहे. अॅक्टिव्ह वन द्वारे आमच्या विमाधारकांना वैयक्तिकृत, फायदेशीर आणि चिंतामुक्त असलेली एक सरलीकृत आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपाय सुविधा अनुभवता येईल हे आम्ही सुनिश्चित करू इच्छितो.”

अॅक्टिव्ह वन त्याच्या अंगभूत वैशिष्ठ्य यांच्या विस्तृत श्रेणीसह वेगळे आहे. रूग्णांच्या रूग्णालयात भरतीसाठी विमा संरक्षण तसेच ९० आणि १८० दिवसांपर्यंत रूग्णालयात दाखल होण्याआधीचा आणि नंतरचा खर्च यांचा समावेश आहे. प्रथमच आदित्य बिर्ला हेल्थ विमा योजने अंतर्गत लिव्ह-इन भागीदार (समान किंवा विरुद्ध लिंग) यांनाही विमा संरक्षण सादर करेल.  याशिवाय, पॉलिसीमध्ये क्रॉनिक केअर कव्हर असून ते अस्थमा, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, लठ्ठपणा आणि कोरोनरी धमनी विकार (PTCA 1 वर्षापूर्वी केले) यासारख्या सात व्याधीसाठी दिवस 1 कव्हर (शून्य प्रतीक्षा कालावधी) प्रदान करते.

स्वास्थ्य, कल्याण यासाठी ABHICL ची बांधिलकी अधिक मजबूत करत अॅक्टिव्ह वन मध्ये हेल्थ रिटर्न्स वैशिष्ट्य समाविष्ट आहे जे विमाधारकांना त्यांचे संपूर्ण प्रीमियम (100% पर्यंत आरोग्य परतावा) परत मिळविण्यास सक्षम करते. हेल्दी हार्ट स्कोअरचा आधार, फिटनेस मूल्यांकन परिणाम आणि मासिक आधारावर रेकॉर्ड केलेल्या Active Dayz™ ची संख्या यावर जमा केले जाऊ शकते. 10,000 पावले चालणे, किंवा नियमित व्यायाम, योग सत्र इ कोणतीही विहित फिटनेस क्रिया करून ग्राहक “Active Dayz™ मिळवू शकतो. आरोग्य परतावा म्हणून मिळविलेला निधी नूतनीकरण प्रीमियम आणि इतर बिगर वैद्यकीय खर्च, बाह्य-रुग्ण खर्च इत्यादीसाठी वापरला जाऊ शकतो.

प्रवेशाच्या कमाल वयावर कोणतीही मर्यादा नसताना अॅक्टिव्ह वन मध्ये टिकाऊ उपकरणे, दुसरे वैद्यकीय मत, वैयक्तिक अपघात, गंभीर आजार आणि कर्करोग बूस्टर यासाठी पर्यायी विमा संरक्षण समाविष्ट आहे.

महत्वाची वैशिष्टे: Ø  १००% हेल्थ रिटर्न्स™: पॉलिसीधारकांना सक्रिय आणि निरोगी जीवनशैली जगून त्यांचे संपूर्ण प्रीमियम परत मिळवण्यास सक्षम करते. हेल्थ रिटर्न्स™ म्हणून कमावलेला निधी नूतनीकरण प्रीमियम आणि इतर बिगर वैद्यकीय खर्च, रुग्णालयाबाहेरील खर्च इत्यादीसाठी वापरला जाऊ शकतो
xØ  दावा हक्क संरक्षण: या वैशिष्ट्यासह, विमाधारकांना हॉस्पिटलायझेशनशी संबंधित सर्व सूचीबद्ध बिगर वैद्यकीय खर्चांसाठी संरक्षण मिळते. यामध्ये फेस मास्क, कापूस, हातमोजे, ऑक्सिजन सिलिंडर इत्यादींसाठी झालेल्या खर्चाचा समावेश आहे.Ø  कोणतीही उप-मर्यादा नाही: मर्यादांवर नाही तर आमच्या विमाधारकांना त्यांच्या गरजांवर आधारित आरोग्यसेवा निर्णय घेण्यास सक्षम बनवत खोलीचे भाडे, आयसीयू शुल्क, सूचीबद्ध आधुनिक उपचार जसे की रोबोटिक शस्त्रक्रिया, ओरल केमोथेरपी इत्यादींवर विम्याच्या रकमेपर्यंत कोणतीही मर्यादा नाही.Ø  सुपर रीलोड: हे वैशिष्ट्य पॉलिसी वर्षात आधारभूत सम इन्शुरन्सपर्यंत अमर्यादित रिफिल देते. जेणेकरून पॉलिसीधारकाचे आरोग्य विमा संरक्षण संपत नाही.Ø  सुपर क्रेडिट: विमाधारकांना विमा योजनेच्या ६ वर्षापर्यंत त्यांची विम्याची रक्कम सहा पटीने वाढते म्हणून दाव्यांचा विचार न करता, अतिरिक्त नाही अशा प्रीमियम पेमेंटवर वैद्यकीय महागाईचा सामना करता येतो. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...