Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यासाठी वर्षभरात ग्राहकसंख्येमध्ये तब्बल ३ लाखांनी वाढ

Date:

‘ऑनलाइन’ वीजबिल भरणारे ७५ टक्के पुणेकर राज्यात अव्वल

पुणे, दि. १८ जानेवारी २०२४:महावितरणचे वीजबिल ‘ऑनलाइन’द्वारे भरण्यासाठी वीजग्राहकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. पुणे परिमंडलात गेल्या एका वर्षात वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करणाऱ्या ग्राहकांची संख्या तब्बल ३ लाख ५ हजार ३०० ने वाढली आहे. सद्यस्थितीत लघुदाब वर्गवारीतील सरासरी २१ लाख ३८ हजार ३५० (७४.५ टक्के) घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहक दरमहा सुमारे ५५९ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व सुरक्षितपणे भरणा करीत आहेत.

महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर सरासरी २८ लाख ७० हजार ९८९ ग्राहक दरमहा वीजबिल भरतात. त्यातील ७४.५ टक्के म्हणजे २१ लाख ३८ हजार ३४८ ग्राहक ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिलांचा भरणा करीत आहेत. सन २०२२ च्या तुलनेत सन २०२३ मध्ये ‘ऑनलाइन’साठी ३ लाख ५ हजारांनी ग्राहकसंख्येत भर पडली असून भरण्याची रक्कम देखील १२९ कोटी रुपयांनी वाढली आहे.

पुणे शहरात गेल्या वर्षभरात ‘ऑनलाइन’साठी पसंती दिलेल्या ग्राहकांची संख्या १ लाख ४६ हजार ३०० ने वाढली असून भरण्याच्या रकमेत देखील ५९ कोटी ३१ लाख रुपयांनी भर पडली आहे. सद्यस्थितीत सरासरी ११ लाख ८० हजार १९१ (७३.६ टक्के) लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहक दरमहा २९५ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करीत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात सरासरी ७ लाख ४ हजार ७६३ लघुदाब वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा करीत आहेत. त्यातील ५ लाख ६३ हजार ८५ (८० टक्के) ग्राहक ‘ऑनलाइन’द्वारे दरमहा १५१ कोटी ७६ लाख रुपयांचा भरणा करीत आहेत. सन २०२३ मध्ये या ग्राहकसंख्येत ८१ हजार १८० ने भर पडली असून ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्याची रक्कम ३५ कोटी ७४ हजार रुपयांनी वाढली आहे.

ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये लघुदाबाच्या सरासरी ५ लाख ६३ हजार ३४४ पैकी ३ लाख ९५ हजार ७४ (७०.१ टक्के) वीजग्राहक ‘ऑनलाइन’द्वारे १११ कोटी ३५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा करीत आहे. सन २०२३ मध्ये या ग्राहकसंख्येत ७७ हजार ८११ ने भर पडली असून भरण्याची रक्कम ३३ कोटी १५ लाख रुपयांनी वाढली आहे.

लघुदाब वीजग्राहकांनी क्रेडिट/ डेबीटकार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेटदवारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यात एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरता येत आहे.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, पुणे परिमंडल– महावितरणच्या आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ग्राहकसेवेमध्ये ‘ऑनलाइन’ सेवा अतिशय महत्वाची आहे. त्यास पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यासोबतच लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे वीजबिल भरण्याची किमान ५ हजार रुपये करण्यात आली आहे. त्यानुसार ५ हजारांपेक्षा अधिक रुपयांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...