रेवड्या संपल्या आणि आता नुसताच ढोल!

Date:

पुणे-रेवड्या संपल्या आणि आता नुसताच ढोल! अशा शब्दात आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहे .

ते म्हणाले,’अभूतपूर्व पूरपरिस्थिती मधून अजून शेतकरी, शेतमजूर सावरलेला नाही. त्यात त्याला कुठलीही मदत अजून आली नाही. दुसरीकडे सणाला,दिवाळीमध्ये जो ‘ आनंदाचा शिधा’ दिला जात होता तोही आता दिला जाणार नाही. आता तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे तीही योजना बंद झाल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना आमिष म्हणून भाजप आणि युती सरकार सातत्याने घोषणा करीत होते. परंतु आता महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यामुळे आता गणेश उत्सवामध्ये सुद्धा आणि आता येणाऱ्या दिवाळीमध्ये सुद्धा रेशन दुकानात कोणताही आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र सरकारने गणेश उत्सवाला राज्योत्सवाचे स्वरूप जाहीर केले त्या निमित्ताने मोठमोठ्या जाहिराती केल्या परंतु सामान्य जनतेला रेशन मध्ये कोणतेही गोडधोड पदार्थ दिले नाहीत. दरम्यान अभूतपूर्व अशी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर शेतकरी, शेतमजूर हे कोलमडून पडलेले असताना आता दिवाळीच्या निमित्ताने दिला जाणारा आनंदाचा शिधा म्हणजे चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल या वस्तूपण आता दिल्या जाणार नाहीत. सरकारच्या उधळपट्टीमुळे लोकांना आवश्यक असलेले, पूर्वी दिले जाणारे रेशनवरचे पदार्थ आधीच कमी झालेली आहेत. त्यात पूर्वीची शिवभोजन थाळी योजना सुद्धा बंद केल्यात जमा आहे. गाजावाजा केलेली तीर्थाटन योजना सुद्धा बंद पडल्यात जमा आहे.
हे सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे दर्शवते. सरकारवरचे कर्ज प्रचंड वाढले आहे आणि तथाकथित रेवडी वाटप आता शक्य नाही. यातील गंभीर बाब म्हणजे अनेक कल्याणकारी योजनांना कात्री लावली जात आहे. सरकार नियोजनामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतमजुरांच्या घरात अन्न नसताना, त्याला कुठलीही नुकसान भरपाई मिळालेली नसताना किमान रेशन द्वारे थोडी मदत होऊ शकली असती. परंतु सरकार गणेशउत्सवाच्या मोठ्या जाहिराती करण्याला प्राधान्य देत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘विजाभज’आश्रम शाळेतील १०० विद्यार्थी पुण्याहून इस्रो भेटीसाठी विमानाने रवाना

पुणे : राज्यातील विविध ‘विजाभज’आश्रमशाळांमधून गुणवत्ता परीक्षेद्वारे १०० विद्यार्थ्यांची...

राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशनची पंढरपूर येथे स्थापना

पुण्यातील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, राष्ट्रीय कर्तव्य अभियान समूहाचा पुढाकारपुणे :...

भावभावना व्यक्त करण्याचे कविता उत्तम माध्यम : सुनील वेदपाठक

२१ व्या गुंफण सद्‌भावना साहित्य संमेलनाचा समारोप पुणे : कवितेचे...

खडकी स्टेशन ते औंध रोड पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करा – सुनील माने

औंध (प्रतिनिधि) : खडकी स्टेशन, औंध रोड या रस्त्यावर वाहतुकीच्या...