पुणे- केवळ कर्मचारी , अधिकारी यांना प्रबोधन करणे याहून आता महापालिकेचे आयुक्त , अतिरिक्त आयुक्त अशा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी स्वतः स्वच्छता मोहिमेत श्रमदानासाठी सहभाग नोंदविलाआहे आज “स्वच्छता ही सेवा २०२५” अंतर्गत भिडे पूल, संपूर्ण नदी पात्र परिसरात श्रमदान स्वच्छता मोहिम संपन्न झाली .
पुणे महानगरपालिका उप आयुक्त, परिमंडळ क्र. ५ कार्यालयाच्या अखत्यारीत कसबा विश्रामबागवाड़ा क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत “स्वच्छता ही सेवा २०२५” अंतर्गत “एक दिवस, एक तास-एक साथ” या श्रमदान उपक्रम अंतर्गत “भिडे पूल, संपूर्ण नदी पात्र परिसरात ” श्रमदान स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या कार्यक्रमात महापालिका आयुक्त, नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी पी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) प्रदिप चंद्रन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी उपस्थित राहून श्रमदान स्वच्छता मोहिम मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच महापालिका आयुक्त यांनी सुचना दिले प्रमाणे संपुर्ण नदीपात्रातील स्वच्छता सेवक व यांत्रिक पद्धतीने करणेत येत आहे. यावेळी उप आयुक्त संदिप कदम (घनकचरा व्यवस्थापन), उप आयुक्त परिमंडळ क्र. ५ सुनिल बल्लाळ, महापालिका सहाय्यक आयुक्त प्रकाश बालगुडे, तिमय्या जंगले, किसन दगडखैर, उप अभियंता सुहास जाधव व सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकादम, सेवक, महाविद्यालय विद्यार्थी, स्वच्छता संस्था, ह्युमन मॅट्रिक संस्था सेवक उपस्थित होते.
भिडे पूल,आणि नदी पात्र परिसरात श्रमदानाने स्वच्छता मोहिमेत नवल किशोर,पृथ्वीराज, चंद्रन, दिवटे सहभागी
Date:

