पुणे – एकूण १२.५ किलो गांजासह एकुण ५ लाख रु. कि.चा मुद्देमाल केला हस्तगत करत पोलिसांनी रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराला पकडले आहे .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.२१/०९/२०२५ रोजी दोन इसम उरुळी कांचन कडुन निगडीकडे जात असुन सदर रिक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची गोपनिय बातमी पोलीस अंमलदार राहुल कर्डीले नेमणुक लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली. सदर बातमी प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी सहा. पोलीस निरीक्षक श्री. कृष्णा बाबर यांचे अधिनस्त एक स्वतंत्र पथक तयार करुन त्या पथकास सापळा रचुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीसांनी रिक्षा येणारे मार्गावर सापळा रचुन संशयीतरिक्षांवर पाळत ठेवली.
दि.२१/०९/२०२५ रोजी सकाळी ०९/१५ वा.चे सुमारास शेतजमीनीलगत, थेउर रेल्वे पुल सर्व्हिस रोड, थेउर, ता. हवेली, जि. पुणे येथे संशयीत रिक्षा दिसताच लोणी काळभोर पोलीसांनी सदर रिक्षा व रिक्षाचालकास ताब्यात घेतले. सदर रिक्षाची पोलीसांनी तपासणी केली असता रिक्षामध्ये रिक्षाचालक नामे लक्ष्मण राजु पवार, वय ३० वर्षे, रा. यमुनानगर मनपा हॉस्पीटलच्या मागे, सिध्दार्थनगर झोपडपट्टी, ओटास्किम निगडी, पुणे याने त्याचा साथीदार याचेसह सुमारे २,४०,०००/-रु किं.चा १२ किलो ३४५ ग्रॅम वजनाचा गांजा, विक्रीकरीता अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, जवळ बाळगले असताना मिळुन आले. सदर गांजा ते त्यांचे ताब्यातील रिक्षानं. एम एच १४ एल एस ३१४६ मधुन घेवुन जात असताना मिळुन आल्याने सदर रिक्षा देखील जप्त करणेत आली आहे. असा एकुण सुमारे ५,००,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल लोणी काळभोर पोलीसांनी जप्त केला आहे. सदर बाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस वरिल नमुद दोन इसम व एका अज्ञात इसमा विरुध्द गु. र. नं.४२४/२०२५, एन.डी.पि.एस. अॅक्ट ८ (क), २० (ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा नोंदवीणेत आला आहे.
लोणी काळभोर पोलीसांना सदर गुन्हयातील आरोपी तसेच रिक्षा नंबर अथवा इत्तर कोणतीही खात्रीशिर माहिती नसताना देखील, त्यांनी अतिशय कौशल्यपुर्णरित्या संशयीतरिक्षा व रिक्षाचालकास ताब्यात घेवुन त्याचेकडुन सुमारे १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
सदरची उकागगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार माने, सातपुते, वणवे, देविकर पोलीस शिपाई राहुल कर्डीले, सोनवणे, दडस, कुंभार, पाटील, कुदळे, विर, गाडे, शिरगीरे यांनी केली आहे.

