पुणे- एकीकडे महापालिकेचा आकाश चिन्ह विभाग बेकायदा होर्डींग्ज आणि फ्लेक्स लावणाऱ्या विरोधात कारवाई करत असताना, एकीकडे आंदेकर यांचे हि फ्लेक्स पोलीस उतरवीत असताना दुसरीकडे काही क्षेत्रीय कार्यालयांचे म्हणजेच महापालिकेचे कर्मचारी राजकीय पुढाऱ्यांचे अनधिकृत फ्लेक्स लावत असल्याचेही दिसून येत आहे.
त्याच राजकीय पक्षाच्या अन्य लोकांवर दुसरीकडे कारवाई होते आणि दक्षिण पुण्यात मात्र राजकीय तळी उचलताना कर्मचारी दिसत आहेत.यातील काही कंत्राटी कर्मचारी आहेत. जे याच पुढाऱ्यांनी महापालिकेत कामाला लावलेले असल्याने त्यांना आपल्या तथाकथित पुढार्याचे ऐकावे लागत आहे.कारण हेच पुढारी नंतर त्यांच्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भांडत असतात असाही अनुभव कथन होतो आहे.कात्रज,नऱ्हे,आंबेगाव,दत्तवाडी,सिंहगड रोड,धनकवडी बालाजी नगर,पद्मावती,तळजाई परिसरात असंख्य अनधिकृत बांधकामे,आणि जुनी घरे पडून नव्या इमारती महापालिकेची परवानगी न घेता,सर्व नियम धुडकावून उभ्या राहत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस न दाखवता गोरगरीब रस्त्यावर पोट भरायला आलेल्या हातगाडी,पथारी आणि स्टॉलवर मात्र येथील क्षेत्रीय कार्यालय धडधड कारवाई करत आहे.अशा पद्धतीने राजकीय पुढाऱ्यांचे हस्तक बनलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचार्यांच्या कामाकडे महापालिका आयुक्त नवल किशोर राम कधी लक्ष देणार आहेत कि नाही ? असा सवाल आता उपस्थित होतो आहे. सत्ताधारी पुढाऱ्यांचे फ्लेक्स लावताना, गोळवलकर गुरुजी पथावर ,खुद्द क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी दिसत आहेत…

