पुणे : अरण्येश्वर चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही अरण्येश्वर नवरात्र उत्सव भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे. यशश्री महिला महोत्सव, भव्य नवदुर्गा महल आणि जिवंत देखावा : रक्तबीज राक्षसाचा वध ही यंदाच्या उत्सवाची खास वैशिष्ट्ये ठरणार आहेत.
उत्सवाचे अध्यक्ष नितीन कदम व आधारस्तंभ माजी नगरसेविका सौ. अश्विनी नितीन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणेकरांसाठी आगळावेगळा सांस्कृतिक मेळावा
कार्यक्रमांचे वेळापत्रक
- २२ सप्टेंबर – घटस्थापना (हस्ते आयुक्त नवल किशोर राम), दुर्गा सप्तशती पठण, भजन व मान्यवरांकडून आरती.
- २३ सप्टेंबर – कन्या पूजन, दुर्गा सप्तशती पठण, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते नवदुर्गा महल उद्घाटन व ढोल-ताशा वादन.
- २४ सप्टेंबर – कन्या पूजन, दुर्गा सप्तशती पठण, “मी व माझे व्यक्तिमत्व” (१५–३० वयोगट).
- २५ सप्टेंबर – महिलांसाठी दुर्गा सप्तशती पठण, श्रीसूक्त पठण व सामुदायिक आरती स्पर्धा.
- २६ सप्टेंबर – “मी व माझी राजकन्या” स्पर्धा (आई-मुलगी सहभाग) व शालेय मुलींसाठी लकी ड्रॉ.
- २७ सप्टेंबर – चित्रकला स्पर्धा, भजन, जिवंत देखावा : रक्तबीज राक्षसाचा वध.
- २८ सप्टेंबर – पाककला स्पर्धा “उपवासाची थाळी”, भजन व जिवंत देखावा.
- २९ सप्टेंबर – “सुदृढ बालक अन् सुजान माता” स्पर्धा, भजन व जिवंत देखावा.
- ३० सप्टेंबर – अष्टमी होम हवन, भजन व जिवंत देखावा.
- १ ऑक्टोबर – “अरण्येश्वर नवदुर्गा पुरस्कार” सोहळा, भोंडला व मंगळागौरी खेळ.
- २ ऑक्टोबर – दसरा उत्सव व भव्य लकी ड्रॉ असे विविध कार्यक्रम होणार असून “दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भक्ती, परंपरा, संस्कृती आणि स्त्रीशक्तीचा गौरव या उत्सवातून अनुभवायला मिळणार आहे. पुणेकरांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद घ्यावा,” असे अध्यक्ष नितीन कदम व आधारस्तंभ सौ. अश्विनी कदम यांनी सांगितले.

