Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अरहम, युतिकाला दुहेरी मुकुट

Date:

पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा

पुणे : अरहम रेदासानी, युतिका चव्हाण यांनी पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून दुहेरी मुकुट मिळवला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा झाली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पीवायसी हिंदू जिमखान्याचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश जाधव, पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, कॉर्पोरेट ॲथलिटसचे संस्थापक अभिजीत चांदगुडे, पीवायसीचे सचिव सारंग लागू, तन्मय आगाशे यांच्या उपस्थितीत झाले. शरयू रांजणे आणि सोयरा शेलार या यंदाच्या स्कॉलरशिपच्या मानकरी ठरल्या.

अरहमने १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे आणि मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्याने एकेरीच्या अंतिम फेरीत अभिक वर्मावर २१-१९, २१-१९ अशी मात केली. यानंतर १५ वर्षांखालील गटाच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत अरहमने आर्या कुलकर्णी सह खेळताना सौरीश काणे-शर्वरी सुरवसे या जोडीवर २१-६, २१-४ अशी सहज मात करून दुहेरी यश मिळवले. अरहमला तिहेरी मुकुट मिळवण्याची संधी काही साधता आली नाही. कारण, त्याला १५ वर्षांखालील गटात मुलांच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. अभिक वर्मा – स्वरित सातपुते जोडीने अरहम-तनिष्क आडे जोडीवर २१-१५, २१-१६ अशी मात केली.

युतिकाने १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे आणि १९ वर्षांखालील मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. एकेरीच्या अंतिम फेरीत तिने सफा शेखवर २१-१२, २१-९ असा सहज विजय मिळवला. यानंतर १९ वर्षांखालील गटाच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत युतिकाने कृष्णा जसूजाच्या साथीने खेळताना आद्य पारसनीस – आरती चौगुले जोडीवर ९-२१, २१-१६, २२-२० असा रोमहर्षक विजय मिळवला.

पुरुष एकेरीत रिषभ देशपांडेने बाजी मारली. त्याने पहिली गेम गमावल्यानंतरही यशस्वी पुनरागमन केले. अंतिम लढतीत रिषभने वसीम शेखवर ८-२१, २१-१४, २१-१६ असा विजय मिळवला.

दिविशा, हिमांश विजेते

स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत दिविशा सिंहने वल्लारी वाटाणेवर २१-१७, २१-१६ अशी मात करून विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात हिमांश हरगुनानीने जेतेपद निश्चित केले. अंतिम फेरीत हिमांशने आरुष सप्रेवर २१-१६, २१-१४ असा विजय मिळवला.

ख्याती, सोमजी विजेते

स्पर्धेतील १३ वर्षांखालील गटात मुलांमध्ये रझा सोमजीने, तर मुलींमध्ये ख्याती कत्रेने जेतेपद पटकावले. मुलांच्या अंतिम फेरी सोमजीने हृदान पाडवेवर २०-२२, २१-१६, २१-१७ असा, तर ख्यातीने आराध्या ढेरेवर २१-१३, २१-१३ असा विजय मिळवला.

अंतिम फेरीचे निकाल –

१७ वर्षांखालील मुले दुहेरी – अर्जुन देशपांडे – अवधूत कदम वि. वि. आदित्य पाटील – चैतन्य परांडेकर २१-१४, २१-९.

महिला दुहेरी – अदिती काळे – अस्मिता शेडगे वि. वि. आरती चौगले – योगिता साळवे १९-२१ २१-१७, २१-१६.

पुरुष दुहेरी – हकिमोद्दिन अन्सारी – वसीम शेख वि. वि. नरेंद्र पाटील – वरद गजभिये २१-११, २१-१७.

३५ वर्षांखालील पुरुष एकेरी – हर्षद भागवत वि. वि. आदित्य काळे २१-१३, २१-१२.

३५ वर्षांखालील पुरुष दुहेरी – चैतन्य डोणे – सौरभ राय वि. वि. भूषण बर्वे – ओंकार केळकर १७-२१, २१-९, २१-१९.

४० वर्षांखालील पुरुष दुहेरी – सचिन मानकर – विनीत दबक वि. वि. दिगंत गुप्ता – निकेत लोखंडे २१-१७, २१-१७.

४५ वर्षांखालील पुरुष एकेरी – शरदचंद्र चावली वि. वि. चेतन शाह २०-२२, २१-१८, २१-११.

५० वर्षांखालील पुरुष एकेरी – महेश कुलकर्णी वि. वि. संजीव कुलकर्णी २१-१४, २१-१०.

५५ वर्षांखालील पुरुष दुहेरी – श्रीनिवास देवस्थळे – विनय दाते वि. वि. नितीन कोन्हर – रवी सारंगपाणी २१-१०, २१-१५.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खराडीतील ‘ए वन स्पा’वर छापा:वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ५ महिलांची सुटका

पुणे - खराडीत असलेल्या 'ए वन स्पा' सेंटरवर पोलिसांनी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...