Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

स्कोडा ऑटो फोक्‍सवॅगन २०२३ मध्ये केली  १४५,७१३ युनिट्सची विक्री

Date:

·         समूहाने २०२३ मध्ये विक्रीचा वेग कायम राखला  देशांतर्गत विक्रीच्या आकड्यांनी सलग दुसऱ्या वर्षी तब्बल १००,००० युनिट्सचा टप्प गाठला

·         स्कोडाफोक्सवॅगनऑडीपोर्शे आणि लॅम्बर्गिनी यांचा पाच ब्रॅण्ड्सचा समावेश असलेल्या या समूहाच्या सर्वाधिक विस्तृत पोर्टफोलियोला सातत्याने मागणी 

·         डिसेंबर २०२३ मध्ये समूहाने १०,००० हून अधिक गाड्यांचे वितरण केले

·         देशांतर्गत विक्रीचा आकडा ,०१,४६५ युनिट्स इतका राहिला तर ४४,२४८ गाड्या निर्यात केल्या गेल्या 

·         समूहाच्या अष्टपैलू MQB-AIN मंचाद्वारे तयार करण्यात आलेल्या मेडइनइंडिया मॉडेल्सचे वितरणाचा लक्षणीय आकडा गाठण्यामध्ये प्रमुख योगदान 

·         ऑडीपोर्शे आणि लॅम्बर्गिनीसारख्या लक्झरी ब्रॅण्ड्सनीही विक्रीतील दोन आकडी वाढीसोबत आपल्या नेत्रदीपक कामगिरीमध्ये सातत्य राखले

·         इंजीनिअर्ड इन इंडियाड्रिव्हन बाय  वर्ल्ड: निर्यातीमध्ये वार्षिक ३२ टक्क्यांची वाढ 

·         व्हिएतनाममध्ये निर्यातीस सुरुवात करण्यास सज्ज, ASEAN बाजारपेठेत खोलवर शिरकाव करण्यासाठी  भारतीय उत्पादनाचे जागतिक दर्जाचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी धोरणात्मक झेप.

मुंबई/पुणे१५ जानेवारी २०२४ – कॅलेंडरवर नवे वर्ष २०२४ सुरू झाले असताना स्कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAVWIPL) ने २०२२ मधील विक्रीच्या आकड्यांची बरोबरी साधणारी कामगिरी करत भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. समूहाने देशांतर्गत पातळीवर १,१०,४६५ नगांच्या विक्रीचा कौतुकास्पद आकडा गाठत, सलग दुसऱ्या वर्षांसाठी १,००,००० नगांच्या विक्रीचा मैलाचा टप्पा पार केला. देशपातळीवरील या यशाला साजेशी कामगिरी करत निर्यातीमध्येही ३२% (इअर-ऑन-इअर) वाढ झाली. भारतातून ४४,२४८ गाड्या परदेशात पाठविल्या गेल्या व त्यातून SAVWPILची विस्तारणारी जागतिक पोहोच अधोरेखित झाली. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारपेठेत समूहाकडून ग्राहकांना वितरित करण्यात आलेल्या गाड्यांच्या एकूण संख्येत ४% वाढ झाली. यातून या समूहाची बाजारपेठेतील भरभक्कम स्थिती व VW समूहाच्या ब्रॅण्ड्सच्या वैविध्यपूर्ण उत्पादनांमध्ये ग्राहकांनी दाखविलेला विश्वास यातून दिसून आला. 

यावर्षी ऑडी, पोर्शे आणि लॅम्बर्गिनी यांसारख्या लक्झरी ब्रॅण्ड्सनी दोन आकडी वाढ साधत मुसंडी मारली व त्यातून आलिशान गाड्या विकत घेण्याची आकांक्षा बाजारपेठेत दिसत असल्याचे सूचित झाले. फोक्‍सवॅगनने वाढीचा हा वेग कायम राखत समूहाच्या सातत्यपूर्ण कामगिरीला पाठबळ पुरविले आहे. यादरम्यान स्कोडाने आपल्या विक्रीचे एकत्रीकरण करत भविष्यातील विस्ताराचा मजबूत पाया रचला आहे. 

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ पियुष अरोरा म्हणाले, “सर्वोत्कृष्टतेप्रती आम्ही जपलेल्या बांधिलकीमुळे आम्हाला सातत्याने प्रगतीपथावर राहता आले आहे ही गोष्ट आम्ही २०२३ मधील आमच्या कामगिरीमधून दाखवून दिली. आमच्‍या मेड-इन-इंडिया मॉडेल्स जागतिक दर्जाचा, दणकटपणा, शैली, ड्रायव्हिंगमधील गतीशीलता व सुरक्षितता यांच्‍या समानार्थी बनल्‍या आहेत. त्याचवेळी लक्झरी गाड्यांच्या श्रेणीनेही दमदार कामगिरी केली आहे व नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. 

याच ताकदीने पुढे जात २०२४ मध्ये आम्ही भारतात आणखी ग्राहकांपर्यंत पोहोचू शकू व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली पोहोच आम्हाला वाढवता येईल असे चित्र आम्हाला दिसत आहे. या लक्ष्याच्या दिशेने आगेकूच करताना समूहाच्या ASEAN बाजारपेठ धोरणाला पाठबळ देण्याच्या दृष्टीने स्कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियाची धोरणात्मक कामगिरी असणार आहे. यासाठी २०२३ साली व्हिएतनाममध्ये सुरू होत असलेल्या उत्पादनासाठी स्थानिक स्तरावर तयार केलेले सुटे भाग पुरविण्यास पाठिंबा देण्यासाठी आम्ही पुण्यातील चाकण केंद्रामध्ये अशा सुट्ट्या भागांच्या प्रदर्शनासाठी पार्टस् एक्झिबिशन सेंटर सुरू केले आहे. हे उपक्रम म्हणजे बाजारपेठेमध्ये व्यापक पातळीवर आपले कार्यक्षेत्र विस्तारण्याच्या दिशेने आम्ही मोठी पावले उचलत असल्याचे द्योतक आहे. 

इलेक्ट्रिक (BEV) आणि ICE मॉटेल्सची सुधारित मिश्रसूचीसह ग्राहकांना विविधतापूर्ण पर्याय देऊ करण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत व ही वाहने समूहाच्या भारतभरातील ५९० हून अधिक संपर्कस्थळांद्वारे आमच्या मौल्यवान ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. या कार्यपद्धतीमुळे स्कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया सर्व आघाड्यांवर प्रगती, नव्या संकल्पना आणि ग्राहक समाधानास चालना देत राहील याची हमी मिळणार आहे.” ते पुढे म्हणाले. 

“२०२३ मध्ये आम्ही प्राप्त केलेली सातत्यपूर्ण वाढ ही नवसंकल्पना आणि ग्राहक-केंद्रिततेचा भक्कम पाया लाभलेल्या आमच्या विक्री व मार्केटिंग धोरणांचे द्योतक आहे. २०२४ मध्ये नेव्हिगेट करत असताना आमचे धोरण ग्राहकांचा अनुभव वाढवण्याच्या आणि भारतातील आमच्या विस्तृत पोर्टफोलिओला अधिक प्रबळ करण्‍याच्‍या दिशेने आहे. ओनरशीपसाठी इष्टतम किंमत निश्चित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे एक नवा ग्राहकवर्ग आमच्याकडे आकर्षित झाला आहे हे पाहणे आमच्यासाठी गौरवास्पद आहे. SAVWIPL मध्ये आम्ही केवळ गाड्यांची विक्री करत नसून तर सूक्ष्‍मदर्शी व मूल्‍याप्रती जागरूक ग्राहकवर्गाचे मन जिंकून घेईल अशा विश्वासार्हतेचे, दर्जा व अतुलनीय सेवेचा वारसा घडवित आहोत.” स्कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियाच्या ग्रुप सेल्स अँड मार्केटिंग विभागाचे एक्झेक्युटिव्ह डिरेक्टर ख्रिश्चन काह्न व्हॉन सीलेन यांनी आपले विचार मांडले. 

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड:

·         पुणे येथे मुख्यालय असलेली स्कोटा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAVWIPL) ही एक नवी कंपनी आहे, जी भारतातील फोक्‍सवॅगन समूहाच्या प्रवासी गाड्यांच्या ब्रॅण्ड्सचे प्रतिनिधीत्व करते. 

·         SAVWIPL ची स्थापना फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (VWIPL), स्कोडा ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAIPL) आणि फोक्‍सवॅगन ग्रुप सेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (NSC) यांच्या एकत्रीकरणानंतर झाली.

·         ही एकत्रिकृत कंपनी स्कोडा ऑटो, फोक्‍सवॅगन, ऑडी, पोर्शे आणि लॅम्बर्गिनी या पाच ब्रॅण्ड्सच्या भारतातील व्यवहारांवर देखरेख ठेवते. 

·         SAVWIPL चे कामकाज पुण्यातील चाकण आणि औरंगाबाद येथील शेंद्रा या दोन ठिकाणच्या उत्पादनकेंद्रांतून चालते. 

·         SAVWIPL भारताशी कटिबद्ध आहे आणि ग्राहकांना हव्याशा वाटणाऱ्या, भारतीय ग्राहकवर्गाच्या गरजा व त्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असतील अशा दर्जेदार गाड्यांचे बहुविध पर्याय त्यांना पुरविण्याचे काम ही कंपनी करत राहील. 

·         स्कोडा ऑटो डिजिलॅब इंडिया हा SAVWIPL चा विभाग प्राग व तेल अविव या शहरांतील केंद्रांच्या साथीने हा जागतिक स्तरावर स्कोडा ऑटोसाठी चपळतेने नवनव्या व्यापारी संकल्पनांना जन्म देणाऱ्या तीन केंद्रांमध्ये आपले स्थान मिळवून आहे. 

·         हा विभाग आयटी उद्योगक्षेत्रातील स्टार्ट-अप सहयोगी म्हणून काम करतो, ज्यामुळे SAVWIPL ला नवसंकल्पना आणि डिजिटल विकास या दोन्ही आघाड्यांवर आपल्या निपुणतेला शाश्वत बळ देता येते. 

·          www.skoda-vw.co.in येथे SAVWIPL विषयी वाचा व अधिक माहिती करून घ्या. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांना अडवल्याने तणाव:चुनाभट्टी-सायन मार्गावर मोठा गोंधळ, अखेर पोलिसांनी नमते घेत रिक्षा सोडल्या

मुंबई- महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी...

बावधनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), विकास प्रतिष्ठान...

संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ: हर्षवर्धन सपकाळ.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीचे बंधन तोडून सामाजिक न्याय,...

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रंगणार संशोधकांचा मेळा

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या हार्डवेअर अंतिम फेरीसाठीदेशभरातील २४ संघांचा सहभाग पुणे: एमआयटी...