पुणे : शहरासाठी आगामी ३० वर्षाचा पाण्यासाठीचा आराखडा तयार करावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) जलसंपदा मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत केली.
राज्याचे जलसंपदा (गोदावरी, कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत दि.२८ जुलै २०२५ रोजी पुणे महानगरपालिकेद्वारे प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्यात येत असलेल्या पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरासाठीचा आगामी ३० वर्षाचा पाण्याचा आराखडा तयार करावा, अशी मागणी केल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकारांना सांगितले.
बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, आमदार सुनिल कांबळे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार विजयबापू शिवतारे, आमदार शंकर मांडेकर, तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जलसंपदा खात्याचे कार्यकारी संचालक हणमंत गुनाले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, मुख्य अभियंता संजीव चोपडे, पाणी पुरवठा मुख्य अभियंता नंदकुमार जगताप उपस्थित होते

