पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा
पुणे : यशराज कदम, आद्य पारसनीस, सार्थक पाटणकर, परीधी बुधवार यांनी पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांच्या चौथ्या फेरीत यशराज कदमने कृष्णा जसूजावर १९-२१, २१-९, २१-१५ असा, आद्य पारसनीसने सुदीप खोराटेवर २१-१५, २१-१८ अशी मात केली. वत्सल्य गर्गने ग्रंथ वालेचावर २१-१०, २१-१७ अशी मात केली. यानंतर सार्थक पाटणकरने तनिष दरपेवर २१-११, २१-९ अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
१९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत श्रीया उत्पटने इरा आपटेवर २१-८, २१-७ असा, सानिका पाटणकरने प्राची शितोळेवर २१-१४, २१-७ असा, त जिज्ञासा चौधरीने नाव्या रांकावर २२-२०, २१-१९ असा विजय मिळवला. सफा शेखने दिव्यांश वहाळवर २१-८, २१-१२ अशी सहज मात केली. परीधी बुधवारने सायुरी थोकलवर २१-११, २१-१७ अशी मात करून आगेकूच केली.
निकाल – उपउपांत्यपूर्व फेरी – १५ वर्षांखालील मुले – कपिल जगदाळे वि. वि. सौरिष काने २१-६, २१-७, राघवेंद्र यादव वि. वि. आरुष अरोरा २१-११, २१-११, तनिष्क आडे वि. वि. स्वरीत सातपुते २१-१९, १९-२१, २५-२३, अभिक शर्मा वि. वि. चिन्मय फणसे २१-१६, २१-१७, एस. सोमजी वि. वि. पार्थ सहस्त्रबुद्धे २१-१५, २१-१३, अभिज्ञान सिंघा वि. वि. सयाजी शेलार २१-१३, २१-१०, विराज सराफ वि. वि. अक्षर झोपे १८-२१, २१-१५, २१-१६, अरहम रेदासानी वि. वि. ध्रुव बर्वे २१-१०, २१-१५.
१५ वर्षांखालील मुली – शर्वरी सुरवसे वि. वि. शिवानी मासळेकर २१-१२, २१-१५, ख्याती कत्रे वि. वि. शिप्रा कदम २१-८, २१-७, मनीषा थिरुकोंडा वि. वि. कायरा निजाहवान २१-५, २१-५, शरयू रांजणे वि. वि. स्वराली थोरवे २१-२, २१-४, स्नेहा भिसे वि. वि. आर्या कुलकर्णी २०-२२, २१-१७, २१-८, अनन्या बोंद्रे वि. वि. मौसम पाटील २२-२०, २१-१८, सोयरा शेलार वि. वि. पद्मश्री पिल्लई २१-९, २१-१३, सान्वी पाटील वि. वि. पर्णवी मोहळकर २१-११, २१-१९,
१७ वर्षांखालील मुले – सुदीप खोराटे वि. वि. श्लोक डागा २१-१६, २१-१४, कविन पटेल वि. वि. रघुवेंद्र यादव २१-६, १५-२१, २१-१६, विहान मुर्ती वि. वि. ओम दरेकर २१-१५, २१-१४, देवांश सकपाळ वि. वि. आधिश ए. २१-११, १९-२१, २१-१४, अवधूत कदम वि. वि. वरद लांडगे २१-१३, २१-१६, अर्जुन देशपांडे वि. वि. नील शोरन २१-८, २१-१६, सार्थक पाटणकर वि. वि. कपिल जगदाळे २१-१३, २१-१४, ओजस जोशी वि. वि. अभिक शर्मा २१-१३, २३-२१, २१-१६
१७ वर्षांखालील मुली – भक्ती पाटील वि. वि. एस. ढाखणे २१-१४, २१-१६, यशस्वी काळे वि. वि. आयुषी मुंडे २१-११, २१-१०, स्नेहा भिसे वि. वि. हृदया साळवी २१-१७, २१-१५, नाव्या रांका वि. वि. आयुषी काळे २१-१३, २१-१३,

