गुरुपौर्णिमा उत्सवात भगवतगीतेच्या १८ अध्यायांचे पठण

Date:

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव ; उत्सवाचे १२८ वे वर्षे

पुणे :  श्रीमद्भगवद्गीतेच्या १८ अध्यायांचे सुस्वर पठण, गीतेची आरती, गीता महात्म्य आणि मंत्र पठणाने संपूर्ण मंदिराचा परिसर भक्तिमय झाला. यावेळी भाविकांनी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२८ व्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित उत्सवात सामूहिक गीता पठणातून आध्यात्मिक वातवरणाची अनुभूती घेतली.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे गुरुपौर्णिमा सप्ताहात गीता धर्म मंडळाच्या वतीने समग्र गीता पठण कार्यक्रमाचे आयोजन मंदिराच्या प्रांगणात श्री दत्त कला मंच येथे करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, विश्वस्त सुनिल रूकारी, राजेंद्र बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक आरास करून त्यातून समग्र संत दर्शन साकारण्यात आले होते.

सकाळी इंदौर येथील अखिल भारतीय त्रिपदी परिवाराच्या पुणे शाखेच्या वतीने तेजस तराणेकर यांच्या अधिपत्याखाली दत्त याग संपन्न झाला. मंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाईंच्या इच्छेनुसार दत्त मंदिरामध्ये दर एकादशीला सायंकाळी कीर्तन होत असते. आषाढी एकादशी निमित्त ह.भ.प. शिवार्चना ताई कुलकर्णी यांचे संत जनाबाईंच्या जीवन चरित्रावर कीर्तन झाले.

याच प्रसंगी उत्सवानिमित्त ‘नादब्रह्म गुरू तत्व रहस्य’ या विषयावर प्रवचनाचे देखील आयोजन करण्यात आले. यावेळी प्रवचनकार श्री गुरूदेव व्यासजी यांनी गुरू महात्म, गुरू संगती, परमात्म्याची ओळख, गुरूतत्व, नादब्रम्ह यावर मार्गदर्शन केले. कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे यांनी श्री गुरूदेव व्यासजी यांचा स्वागत व सन्मान केला.

श्री गुरूदेव व्यासजी म्हणाले, परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होईपर्यंत आपण मानवनिर्मित देवतांची पूजा करत असतो, परंतु गुरूच आपल्याला परब्रह्मतत्त्वाची अनुभूती देतो. अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा, पाप-पुण्याच्या चक्रातून मुक्त करणारा आणि अंतर्मनातील ब्रह्मतत्त्वाची ओळख करून देणारा गुरूच खऱ्या अर्थाने जीवनाचा दिशादर्शक असतो, असेही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 50% वरून 18% पर्यंत कमी केला;रशियाकडून तेल खरेदी करणार नाही,व्हेनेझुएलाकडून घेईल-भारताकडून ग्वाही

भारत आणि अमेरिकेदरम्यान ज्या व्यापार कराराची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती,...

भोसरी व पिंपरी विभागातील वीज पुरवठ्यावर परिणाम

महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन पुणे, दि. २ फेब्रुवारी,२०२६ : महापारेषण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा:EpsteinFiles प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन

एपस्टीन फाईल्समधील खुलासे भारताच्या परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय हित आणि...