
पुणे – वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय “सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॉन” स्पर्धेत ४२ किलोमीटर अंतरासाठी पुरुष गटात निलेश कुलये तर महिला गटात पूजा कृष्णमूर्ती यांनी प्रथम क्रमांक पटकावत आपली विजयी घौडदौड सिद्ध केली.
यावर्षी जगभरातून ८ देश, भारतातील २४ राज्य व ४५ शहरातून ११ कि.मी., २१ कि. मी., ३० कि.मी., व ४२ कि.मी. अंतर धावण्यासाठी धावपट्टूंनी सहभाग घेतला होता. स्वराज्याचा दैदीप्यमान ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंहगडावर ही स्पर्धा सिंहगडाच्या वेगवेगळ्या पाच वाटांवरून पूर्ण करायची असते. सलग ११ तास चालणाऱ्या या माउंटन ट्रेल मॅरेथॉनमध्ये डोंगर -दऱ्या, चिखल, कडे-कपाऱ्या, आणि सिंहगडाच्या विविध वाटांवरून चित्तथरारक अनूभव स्पर्धकांना मिळतो. पर्यावरण संरक्षण, पुरातन वास्तू आणि गडकोट संवर्धनाच्या संदेशाबरोबरच व्यायामाचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो.
स्पर्धेचे उद्घाटन उप.जिल्हाधिकारी, शिवरायांच्या युद्धकलेचे आणि गडकोटांचे अभ्यासक सतिश राउत, सिंहगड रोपवेचे संचालक उदयराज शिंदे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने, पुणे वनविभागाचे अधिकारी मनोज बारबोले व समाधान पाटील, पुणे ग्रामिण पोलिसचे अधिकारी प्रविण मोरे, पर्यटन विभागाचे प्रमुख, घेरा सिंहगड ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रामस्थ, व स्पर्धेचेसर्व स्वयंसेवक उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिग्विजय जेधे, फाऊंडेशनचे सदस्य अनिल पवार, मंदार मते, महेश मालुसरे, ॲड. राजेश सातपुते, मारूती गोळे, अमर धुमाळ यांनी केले आहे.
सिंहगडाच्या पायथ्याशी रोपवे कार्यालयाजवळ स्पर्धेची सुरुवात व सांगता झाली. ही स्पर्धा केवळ धावण्यापुरती मर्यादित नसून पर्यावरण, गडकोट संवर्धन, आणि पुरातन वास्तू रक्षणाचा संदेशही ती देत असते.
विजेते पुढीलप्रमाणे:
४२ कि.मी. पुरुष:
१) निलेश कुलये – ४:५८:१३
२) प्रीतम आसरानी – ५:५१:५५
३) पुलकीत वर्मा – ६:१८:५१
४२ कि.मी. महिला:
१) पूजा कृष्णमूर्ती
३० कि.मी. पुरुष:
१) अनिकेत पवार – ३:१६:३०
२) संजय नेगी – ३:२८:३७
३) नितीश कुमार – ३:३८:३५
३० कि.मी. महिला:
१) वीणा तडसरे – ५:३२:१५
२) हेमा आवळे – ६:०६:०९
३) श्रीमा एस बालिगा – ६:१६:४०
२१ कि.मी. पुरुष:
१) इनेश वसवा – २:११:२७
२) विशाल राजभर – २:३१:५४
३) भूषण शिंदे – ३:०३:१५
२१ कि.मी. महिला:
१) गीतांजली गुब्बेवाड – ४:१३:२३
२) तान्या डकवर्थ – ४:२२:२०
३) श्रद्धा वस्सा – ४:३३:५२
११ कि.मी. पुरुष:
१) साहिल भोसले – १:१७:१३
२) तनय कचरे – १:१८:१९
३) वर्धन गोयल – १:२१:३१
११ कि.मी. महिला:
१) सुरभी मेरूकर – १:४९:२८
२) शोभा सिंग – १:४९:५६
३) पूजा वैद्य – २:०६:५६

