पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पर्वती पुणे येथे राजर्षी शाहू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. गिरीष प्रभुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तंजावरचे छत्रपती विजयसिंहराजे भोसले, सौ.प्रमिला गायकवाड, सरचिटणीस आखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, , संयुक्त चिटणीस अजय पाटील, वासंती बोर्डे, खजिनदार ॲड भगवानराव साळुंखे, नियामक मंडळाच्या अध्यक्ष कमलताई व्यवहारे,के. टी. सोनावणे यांचे उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात राजर्षी शाहू महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याविषयी बोलताना डॉ. गिरीष प्रभुणे यांनी शाहूमहाराज यांनी शिक्षण हे एकमेव ध्येय डोळ्यापुढे ठेवून शिक्षण प्रसाराचे कार्य केले. त्यासाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले व जे पालक मुला-मुलींना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना दंड तसेच त्याच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याचा कायदा तयार केला. जात हे भारतीय समाजाचे वास्तव आहे हे ओळखून शैक्षणिक विषमता दूर करण्यासाठी जातनिहाय बोर्डिंग, स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारा दूरदर्शी राजा म्हणजे शाहू महाराज होय. चातुवर्ण समाजव्यवस्थेला छेद देऊन आपल्या राजदंडाचा वापर स्त्री उद्धारासाठी केला. विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह, दलितांबरोबर मानवतावादी व्यवहार करण्याचा पायंडा स्वतःपासून घातला.औद्योगिक व कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केली. कुस्ती,गायन,चित्रकला या सारख्या विविध कलांना राजाश्रय दिला असे उपस्थितांना मार्गदर्शन केले. छत्रपती विजयसिंहराजे भोसले यांनी या प्रसंगी बोलताना आयुष्याचे प्रश्न सोडविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून कौशल्याआधारित शिक्षणाचे महत्व जाणणारा द्रष्टा राजा म्हणजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मा. सौ.प्रमिला गायकवाड सरचिटणीस आखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या विविध शाखा, राबविले जाणारे विविध अभ्यासक्रम,पुरविल्या जाणाऱ्या सुविधा विषयी सांगून संस्थेचा परिचय करून दिला. सदर कार्यक्रमासाठी पद्मश्री डॉ. गिरीष प्रभुणे, छत्रपती विजयसिंहराजे भोसले, सौ.प्रमिला गायकवाड, अजय पाटील, वासंती बोर्डे, ॲड भगवानराव साळुंखे, मा.कमलताई व्यवहारे, के. टी. सोनावणे, संस्थेचे सदस्य, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दीपक गायकवाड यांनी केले तर आभार संयुक्त चिटणीस अजय पाटील यांनी मानले.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेत राजर्षी शाहू जयंती उत्साहात साजरी…..
Date:

