जागतिक अमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, अमली पदार्थ विरोधी पथक – पुणे पोलीस, आणि मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे: गांजा, अफू, चरस, दारू यांसारख्या व्यसनांचे प्रतिकात्मक रूप असलेल्या राक्षसाची होळी करून, नव्या पिढीसाठी घातक ठरणाऱ्या व्यसनांचा प्रतिकार करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी तरुणांनी व्यसनमुक्त होण्याची शपथ घेतली.
जागतिक अमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, अमली पदार्थ विरोधी पथक पुणे पोलीस, आणि मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप भोसले, सुदर्शन गायकवाड, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, प्रा.डॉ. पुनम शिंदे, आपलं फाउंडेशनचे मनीष भोसले, प्राचार्य गणेश पठारे, डॉ. अश्विन पारखे, प्रा. दशरथ गावित, प्रा. शिल्पा काब्रा, प्रा. अमित गोसावी, आपलं फाउंडेशन संस्थेचे गुरुप्रसाद रंधे, एन एस एस च्या प्रा. वैशाली निंबाळकर, आनंदवन चे विशाल शिंदे, सागर कांबळे,दत्ता सोनार आदि उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये व्यसनांविषयी सजगता निर्माण करण्याचा आणि त्यांना व्यसनमुक्त आयुष्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक सत्राचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते.
डॉ. अजय दुधाणे म्हणाले, आजचे तरुण व्यसनांच्या विळख्यात अडकत चालले आहेत. गांजा, चरस, निकोटीन, अल्कोहोल आणि स्क्रीन अॅडिक्शनसारखी नवी व्यसने तरुणाईचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. अशा काळात केवळ कायद्याने नव्हे, तर सामाजिक आणि मानसिक पातळीवरही लढा उभारणे गरजेचे आहे. ऋषिकेश इंगळे यांनी सूत्रसंचलन केले. सूरज कांबळे यांनी आभार मानले.

