मुंबई- : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. “मला खरंच कीव येते जे आपला बाप बदलतात, आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाही, अशी लोकं जेव्हा आपल्या घराणेशाहीवर टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते. अरे तुला राजकारणात पोरं होत नाहीत तर मी काय करु. आमच्याकडे आहेत, घ्यायची असेल तर घे. किती पाहिजेत? कारण भाजप पक्ष असाच आहे”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“आपण सत्य नाकारतो का कधी? त्यामुळे त्यांनी हे सत्य स्वीकारलं पाहिजे की, त्यांना आजपर्यंत पोरं झाली नाहीत म्हणून त्यांनी दुसऱ्यांची नेते स्वीकारायचे, ते मोठे करायचे, दुर्दैव असं ज्या सरदार पटेल यांनी संघावर बंदी आणली होती त्याच पटेलांना नेता म्हणून जगातला सर्वात मोठा पुतळा बांधण्याची वेळ ह्यांच्यावर आली. हे ह्यांचं कर्तृत्व आणि आपल्याला शिकवतात हिंदुत्व”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
आज सगळीकडे लागलेल्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचे फोटो आहेत. जे आपला बाप बदलाल आणि ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, अशी लोक आपल्या घराणेशाहीवर टीका करतात, तेव्हा मला त्यांची कीव येते. तुला राजकारणात पोरं होत नाहीत, त्याला आम्ही काय करू. आमच्याकडे आहेत, घ्यायची तर घे. किती पाहिजेत? कारण भाजप असाच आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.शिवसेनेचा पहिला शिवतीर्थावर झाला होता. शिवाजी पार्क प्रचंड भरले होते. पैसा फेको तमाशा देखो तसे तेव्हा काहीच नव्हते. व्यासपीठावर माझे आजोबा, शिवसेनाप्रमुख होते. मी माझ्या आईच्या मांडीवर मैदानात बसलो होतो. आज ज्यांना दाढी फुटली आणि दाढी खाजवत आहेत, ते तेव्हा कुठे असतील याची मला कल्पना नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
कुणाला वाटत असेल की, शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसुन टाकाल, तर तुमचे नामोनिशाण महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसुन टाकल्याशिवाय राहणार नाही. भाजपचे या महाराष्ट्रातून नामोनिशाण पुसुन टाकू. आज तर मी तयारीने उभा आहे, असे ते म्हणाले. तसेच नाना पाटेकरांच्या प्रहार चित्रपटातील कम ऑन किल मी… डॉयलॉग मारला. ते पुढे म्हणाले, असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल, तर अॅम्ब्युलन्स घेऊन या. कारण येताना सरळ याला, जाताना आडवे होऊन जाल, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपला जाहीर आव्हान दिले.
पहलगामचे अतिरेकी कुठे गेले? अजून का मिळत नाहीत? भाजपात गेले का?
तुम्ही सैन्याचे पाय बांधले. नाही तर पाकिस्तान घेतलाच असता. पण ट्रम्पचा फोन आल्यावर आवाजच गेला. काय करायचे असे पंतप्रधान. काय करायचे असे गृहमंत्री. युक्रेन की वार रुकवादी पापा. चार अतिरेकी आलेच कसे. अतिरेकी गेले कुठे. पाताळात गेले, आकाशात गेले की भाजपात गेले. अजून मिळत कसे नाही. सांगता येत नाही. गेले असतील घेतले असतील. आता फक्त दाऊदला घ्यायचे बाकी आहे. बाकी सर्व झाले आहे. भाजपने नवीन सदस्य नोंदणी सुरू केली. जेलच्या तुरुंगाबाहेरच स्टॉल टाकले. इथे येतो की तिथे जातो. लोकांना आयुष्यातून उठवायचे. भ्रष्टाचारी म्हणून बोंबाबोंब करायचे. एसआयटी लावू हे लावू ते लावू. मग एसआयटीची एसटी झाली का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

