पुणे- यंदा पाउस लवकरच सुरु झाला , जोरदार पाउस झालेला असला तरी धरण क्षेत्रात मात्र त्यामानाने पाण्याचा साथ झाल्याचे जाणवले नाही . आता मात्र आज खडकवासल्यातून मुठा नदीत पाणी सोडले जाऊ लागले आहे आज दुपारी प्रथम ठीक दुपारी . 1.00 वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 1920 क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात आला त्यानंतर सुरू असणारा 1920 क्युसेक्स विसर्ग वाढवून संध्याकाळी 06:00 वा. 4345 क्यूसेक्स करण्यात आला आहे आणि अजून तासाभराने म्हणजे संध्याकाळी 07:00 वा. 8734क्यूसेक्स करण्यात येणार आहे,
धरण साखळीत एकूण २९.७८ टक्के एवढाच पाणी साठा झालेला आहे. जो गेल्या वर्षी आजच्या दिवशी १२. ४३ टक्के एवढाच होता . मात्र खडकवासला 83.95% भरले आहे. पानशेत 23.13% तर वरसगाव 32.45% आणि टेमघर अवघे 10.84% भरले आहे. आजतागायत सर्व धरणात मिळून 08.68 TMC पाणी साठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी तो 03.62 TMC एवढाच होता , यावेळी गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे महिनाभर अगोदर पाउस लवकर सुरु झाला. हे महत्वाचे आहे.

