Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नीना कुळकर्णी व सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Date:

नाट्यसंस्कृती परंपरेचं आपलं मूळ न सोडता कालानुरूप त्यात सृजनात्मक आणि कल्पक असे नाविन्यपूर्ण बदल करत आपली नाट्यसंस्कृती जपण्याचं काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सर्व नाट्य कलावंतांच्या सहकार्याने  केले आहे. त्याचाच एक भाग  म्हणून नटराजाच्या सेवेसाठी आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या कलावंतांचा हा सन्मान अभिमानाचा आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. कै.गोविंद बल्लाळ देवल स्मृतीदिनाप्रीत्यर्थ आयोजित पुरस्कार सोहळयात ते बोलत  होते. प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ  रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. हा सोहळा सांस्कृतिक चळवळीच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त करताना शासनाच्या मदतीने सांस्कृतिकतेचा परीघ अधिक व्यापक करण्याचं आश्वासनही .आशिष शेलार यांनी यावेळी दिले.

यावेळी अ.भा.मराठी नाटय परिषदेचे उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त शशी प्रभू, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे तसेच इतर पदाधिकारी, नियामक मंडळ सदस्य व  मराठी नाट्यसृष्टीतील मान्यवर कलावंत उपस्थित होते.

ह्यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना  महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, मानपत्र आणि रोख रक्कम रु.५१,०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

पुरस्कारानंतर बोलताना ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ज्येष्ठ  लेखक  पु.ल. देशपांडे आणि छोटा गंधर्व या दोघांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून मी ही संगीत नाट्यसेवा केली. त्याचे फलित म्हणजे आजचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा हा ‘जीवनगौरव पुरस्कार’. या पुरस्काराचा मी मनापासून स्वीकार करत सर्वांचे मनापासून आभार मानतो. संगीत नाटकाच्या विकासासाठी शासनाच्या सहकार्याची गरज ही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

‘नाट्यसेवेत कार्यरत असताना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराची खुमारी काही औरच असते’ असं सांगताना,‘या वाटचालीत  मिळालेले समाधान आणि भाग्य  मोलाचे  असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती नीना कुळकर्णी यांनी केले’. या पुरस्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तसेच गुरु म्हणून लाभलेल्या प. सत्यदेव दुबे, विजया मेहता तसेच मार्गदर्शक ठरलेल्या विमलताई राऊत, डॉ. काशिनाथ घाणेकर, नाट्यसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि कुटुंबाचे आभार नीना कुळकर्णी यांनी यावेळी मानले. नाट्यसेवा हा आपला श्वास आहे तो न सोडण्याचा पती कै. दिलीप कुळकर्णी यांचा सल्ला हा जीवनगौरव पुरस्कार घेताना प्रकर्षाने आठवतो, असंही त्यांनी यावेळी सांगितले.       

यावेळी नाट्य परिषदेच्यावतीने लोककलावंतांना मदत, नाट्यसंस्थच्या प्रवासी बससाठी आरटीओ नियमावलीत बदल, नाट्यगृहांचं योग्य तो सांस्कृतिक व्यवस्थापन आदि मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष (उपक्रम)  भाऊसाहेब भोईर यांनी  महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना यावेळी दिले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे म्हणजेच नाट्यपरिषद करंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील २० केंद्रावर दिनांक २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी आणि अंतिम फेरी दिनांक १८ ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार आहे. प्रथम क्रमांकास १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ७५,०००/- रुपये, तृतीय क्रमांकास ५०,०००/- उत्तेजनार्थ क्रमांकास २५,०००/- रुपये आणि इतर वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी केली.

या सोहळ्यात ‘गंधर्व भूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट प्रस्तुत, मराठी रंगभूमी,पुणे निर्मित….गोविंदायन” कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमामध्ये संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक नाटकातील प्रवेशांचे सादरीकरण झाले.

या कार्यक्रमामध्ये निनाद जाधव, श्रध्दा सबनीस, वैभवी जोगळेकर, सुदीप सबनीस, चिन्मय जोगळेकर आणि अस्मिता चिंचाळकर या कलाकारांचा सहभाग होता.

पुरस्कार प्राप्त मान्यवरांची यादी  पुढीलप्रमाणे

व्यावसायिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लेखक सुनिल हरिश्चंद्र व स्मिता दातार (नाटक : उर्मिलायन), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अद्वैत दादरकर (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये  (नाटक : असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे (नाटक : मास्टर माइंड),  सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार निषाद गोलांबरे (नाटक : वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार राजेश परब (नाटक : गोष्ट संयुक्त मानापमानाची), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक असेन मी नसेन मी (संस्था : स्क्रीप्टज क्रिएशन), सर्वोत्कृष्ट अभिनेता सुव्रत जोशी (नाटक : वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रशांत दामले (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हृषीकेश शेलार (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नीना कुळकर्णी (नाटक : असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री शर्मिला शिंदे (नाटक : ज्याची त्याची लव स्टोरी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शुभांगी गोखले (नाटक : असेन मी नसेन मी) आणि अभिनयासाठी विशेष लक्षवेधी पुरस्कार निहारिका राजदत्त (नाटक : उर्मिलायन), नाट्य परिषद युवा नाट्य पुरस्कार श्री. सुशांत शेलार, नाट्यपरिषद- मुंबई कार्यकर्ता पुरस्कारासाठी महेश कापडोसकर, नाट्यपरिषद- शाखा कार्यकर्ता पुरस्कारासाठी सागर मेहेत्रे, सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी विक्रांत शिंदे, सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कारासाठी संतोष लिंबोरे (पाटील), गुणी रंगमंच कामगार सतीश काळबांडे, नाट्यसमीक्षक पुरस्कारासाठी अनिल पुरी, बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी मीनल कुलकर्णी, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कारासाठी विजय नाट्य मंदिर, नाशिक, सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कारासाठी अजय कासुर्डे, रंगभूमी व्यतिरिक्त केलेल्या विधायक कार्यासाठी विद्याधर निमकर, विष्णु मनोहर, प्रसाद कार्ले, सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कारासाठी डॉ. गणेश चंदनशिवे, भावेश कोटांगले, शाहिर राजेंद्र कांबळे, आसराम कसबे, कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारासाठी डॉ. चंद्रकांत शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. 

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक संगीत आनंदमठ (संस्था : कल्पक ग्रुप, पुणे), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक मिडिआ (संस्था : रुद्रेश्वर, गोवा), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक दिग्दर्शक मुकुल ढेकळे (नाटक : मून विदाऊट स्काय), सर्वोत्कृष्ट पुरूष कलाकार यशवंत चोपडे   (नाटक : ब्लँक्ड इक्वेशन),  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पूनम सरोदे (नाटक : वेटलॉस) प्रायोगिक संगीत नाटक सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता अभिषेक काळे (सं. नाटक : संगीत अतृप्ता) प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री अनुष्का आपटे ( सं. नाटक : संगीत आनंदमठ), प्रायोगिक सर्वोत्कृष्ट नाटक लेखक डॉ. सोमनाथ सोनवळकर (नाटक : द फिलिंग पॅरोडॉक्स)

नाट्य क्षेत्रातील व्यावसायिक / प्रायोगिक नाट्य निर्मात्यांना आणि नाट्य व्यवस्थापकांना सहकार्य केल्याबद्दल मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती वृषाली शेट्ये यांना आणि ५१ वर्ष प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अनुराग, कल्याण या संस्थेला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर

छत्रपती  शिवाजी महाराजांच्या  स्वराज्य उभारणीत  त्यांच्या  तेजस्वी पराक्रमासोबत  त्यांचे ...

येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने हल्ला

पुणे-येरवडा कारागृहात एका कैद्यावर फरशीने जीवघेणा हल्ला करण्यात आला...

मनीष रायते ठरला मुळशी केसरी २०२५चा मानकरी

मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ : मुळशीच्या आखाड्यात ऐतिहासिक...

Pcmc आयुक्त हेही युती सरकारच्या प्रचार मोहिमेचे प्यादे ? आप चा थेट प्रहार

आजचे लाभार्थी कंत्राटदार हे भाजपचे देणगीदार आहेत की सरकारच...