नवी दिल्ली – तेल आणि वायू, ऊर्जा आणि प्रक्रिया उद्योगांसाठी विशेष प्रक्रिया पाइपिंग सोल्यूशन्स पुरवणारी भारतातील आघाडीची कंपनी डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडने (DDEL) शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञानातील जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी International Clean-Tech Partner सोबत एक धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. या सहयोगाद्वारे DDEL हरित हायड्रोजन क्षेत्रात प्रवेश करत असून भारत आणि थायलंडमध्ये मॉड्युलर हायड्रोजन उत्पादन प्रणालींच्या अंमलबजावणीवर भर देण्यात येणार आहे.
नव्याने करण्यात आलेल्या सामंजस्य करार (MoU) अंतर्गत, दोन्ही कंपन्या एकत्रितपणे हरित हायड्रोजन उत्पादन प्रणाली प्रकल्पांची संकल्पना, निविदा आणि अंमलबजावणी करतील. या भागीदारीमध्ये इलेक्ट्रोलायझर्स, सेपरेटर्स आणि हायड्रोजन शुद्धीकरण प्रणाली यांसारख्या हायड्रोजन तंत्रज्ञानातील International Clean-Tech Partner चे जागतिक पातळीवरील अग्रणी नेतृत्व आणि DDEL ची 99.9999% शुद्धतेच्या अतिशय शुद्ध हायड्रोजन शुद्धीकरण प्रणाली तयार करण्याची ताकद यांचा समावेश असेल. याला प्रकल्प अंमलबजावणी, विपणन कौशल्य आणि दीर्घकालीन ग्राहक नेटवर्क यांची जोड दिली जाईल.
डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. कृष्ण ललित बंसल म्हणाले, “ही भागीदारी म्हणजे आमच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक निर्णायक टप्पा आहे. International Clean-Tech Partner चे सिद्धहस्त तंत्रज्ञान आणि DDEL च्या अंमलबजावणीतील कौशल्यासह, भारत व थायलंडच्या हरित हायड्रोजन उद्दिष्टांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती साधू शकू असा आमचा विश्वास आहे. हायड्रोजन हे जागतिक डीकार्बोनायझेशनचे प्रमुख साधन होणार असून, अशा द्रष्ट्या आणि सक्षम भागीदारासोबत मार्गक्रमण करताना आम्हाला अभिमान वाटत आहे.”
International Clean-Tech Partner कंपनीला पर्यावरण आणि स्वच्छ ऊर्जा प्रणालीतील उत्कृष्टतेची परंपरा लाभलेली असून प्रगत हायड्रोजन निर्मिती प्रकल्प, फ्ल्यू गॅस क्लीनिंग सिस्टम्स आणि अल्ट्रा-लो इमिशन टेक्नॉलॉजीजसह जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. अनेक देशांमध्ये असलेले कंपनीचे प्रकल्प उच्च कार्यक्षमतेसह पर्यावरणपूरक शाश्वत परिणाम साधतात.
त्याच वेळी, DDEL ने अलीकडेच M/s Molsieve Designs Limited मधील बहुतांश हिस्सा विकत घेतल्याने आपला ग्रीन एनर्जी पोर्टफोलिओ भरीव बळकट केला आहे. ही कंपनी 22 वर्षांहून अधिक काळ 99.9999% शुद्धतेची हायड्रोजन शुद्धता प्रणाली तयार करण्याच्या अनुभवासह कार्यरत आहे. या अधिग्रहणामुळे DDEL ची स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील तांत्रिक आणि उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सामंजस्य करारामधील मुख्य मुद्दे:
· International Clean-Tech Partner कंटेनराइज्ड व मॉड्युलर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांसाठी तांत्रिक सहाय्य, कोअर सिस्टीम्स व सबसिस्टीम्सचा पुरवठा तसेच डिजिटल मॉडेल, कागदपत्रे आणि संयुक्त ब्रँडिंग उपक्रमांमध्ये सहकार्य करेल.
· DDEL स्थानिक विपणन, निविदांमध्ये सहभाग, प्रकल्प अंमलबजावणी, कायदेशीर मंजुरी प्राप्त करणे आणि भारत व थायलंडमधील दीर्घकालीन विक्रीनंतर सेवासुविधा य यांची जबाबदारी सांभाळेल.
भागीदारीचे थोडक्यात फायदे:
Ø या सहयोगामुळे दोन्ही कंपन्यांना जलद वाढणाऱ्या क्षेत्रात स्पर्धात्मक अग्रक्रम मिळेल. याचे कारण हायड्रोजन आधारित पायाभूत सुविधा प्रभावीपणे विस्तारण्यासाठी जागतिक तांत्रिक सखोलता आणि स्थानिक अंमलबजावणी क्षमता यांचा संगम फार थोड्या कंपन्यांकडे आहे.
Ø भारताच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनशी संलग्नता:
हा सहयोग भारत सरकारच्या “भारताला ग्रीन हायड्रोजन व त्याच्या डेरिव्हेटिव्ह्जच्या उत्पादन, वापर आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनवण्याच्या” दृष्टीकोनाशी थेट सुसंगत आहे. भारतात आणि इतरत्र ग्रीन हायड्रोजन प्रकल्प पुढे नेऊन, DDEL देशाच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे लक्ष्य गाठण्यास हातभार लावत आहे, त्याचप्रमाणे जीवाश्म इंधनांवरील परावलंबन कमी करत अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात डीकार्बोनायझेशन घडवून आणत आहे.
ही भागीदारी भारताच्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन आणि थायलंडच्या अक्षय ऊर्जा रोडमॅपशी पूर्णपणे सुसंगत असून, DDEL च्या शाश्वत पायाभूत सुविधांबाबतच्या बांधिलकीस आणि स्वच्छ, अक्षय ऊर्जा क्षेत्रातील जागतिक परिवर्तनास बळकटी देते.
ही भागीदारी दीर्घकालीन भागधारक मूल्य निर्माण करेल आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात DDEL ला एक महत्त्वाची कंपनी म्हणून स्थापित करेल असा संचालक मंडळाचा विश्वास आहे.

