मुंबई; 13 जून 2025: भारतातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय जनरल इन्शुरन्सने श्री. मोहम्मद आरिफ खान यांची डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (उपमुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.
श्री. मोहम्मद आरिफ खान हे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये 25 वर्षांपेक्षा जास्त काळ उल्लेखनीय सेवा केलेले एक अनुभवी बँकिंग व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रातील विविध धोरणात्मक आणि कार्यकारी विभागांमध्ये समृद्ध अनुभव आणि नेतृत्वगुण आहेत.
श्री. मोहम्मद आरिफ खान यांनी 2000 मध्ये एसबीआयमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर रिटेल बँकिंग, स्ट्रॅटेजिक ट्रेनिंग युनिट (STU), कोअर बँकिंग सोल्युशन (CBS) अंमलबजावणी व प्रशिक्षण प्रकल्पांसह अनेक महत्त्वाच्या अग्रणी भूमिका पार पाडल्या आहेत. सध्या ते एसबीआयच्या तिरुवनंतपुरम येथील स्थानिक मुख्यालयात जनरल मॅनेजर, नेटवर्क-I म्हणून कार्यरत होते. तेथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक व कार्यप्रणाली उपक्रमांचे नेतृत्व केले.
नियुक्तीबाबत बोलताना एसबीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवीन चंद्र झा म्हणाले, “श्री मोहम्मद आरिफ खान यांचे एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या नेतृत्व संघात स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. विविध बँकिंग कार्यप्रणालीतील त्यांचा सखोल अनुभव, उत्कृष्ट धोरणात्मक कौशल्ये व व्यवसायातील खोल समज कंपनीला उच्च शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. नाविन्यपूर्णता, ग्राहक मूल्य वृद्धी याला आम्ही चालना देत असताना आणि सर्वसाधारण विमा उद्योगातील आमचे स्थान बळकट करण्याच्या प्रवासात त्यांच्या सोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”
आपल्या नियुक्तीबाबत बोलताना श्री मोहम्मद आरिफ खान म्हणाले, “एसबीआय जनरल इन्शुरन्स कुटुंबाचा भाग होताना मला अत्यंत आनंद होत आहे. भारतातील जनरल इन्शुरन्स क्षेत्रामध्ये परिवर्तनात्मक विकासाची प्रचंड क्षमता आहे आणि त्या वाटचालीचे नेतृत्व करण्याची संधी एसबीआय जनरलकडे आहे असे मला वाटते. उत्तम ग्राहक अनुभव तयार करण्यासाठी, लाभदायक वाढीची पूर्तता करण्यासाठी, सतत बदलत्या गरजांच्या पूर्ततेसाठी नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करण्याकरता आणि वंचित बाजारपेठांमध्ये आमचा विस्तार करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझा भर आपले ग्राहक, समभागधारक आणि आपण सेवा देत असलेल्या समुदायांसाठी अर्थपूर्ण मूल्य निर्माण करण्यावर असेल.”
श्री आरिफ खान हे गणित विषयातील पदव्युत्तर पदवीधारक असून ते सर्टिफाइड इन्फर्मेशन सिस्टिम्स ऑडिटर (ISACA, USA) आहेत. त्यांनी अॅडव्हान्स्ड वेल्थ मॅनेजमेंट (IIBF) मध्ये PGDFA आणि रिस्क मॅनेजमेंट अँड अॅफीलीएट ऑफ रिस्क मॅनेजमेंट असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे RMAI सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे. त्यांची ही नियुक्ती एसबीआय जनरलच्या नेतृत्व संघाला बळकटी देण्याच्या व आपल्या मौल्यवान ग्राहकांसाठी उत्कृष्ट विमा उत्पादने व सेवा प्रदान करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.