पुणे- पुण्याची गुन्हेगारी,पुण्याचे पोलीस आणि पुणेकर जनता हा कायमच आत्सुक्याचा विषय राहिला आहे. जक्कलसुतार पासून राठी हत्याकांड नंतर पुण्यात झालेले स्फोट यात पोलिसांनी केलेलं काम उल्लेखनीय राहिलं आहे.महादेव गोविंद नरवणे नावाच्या तुरुंग महानिरीक्षकांनी गुन्हेगार संपविण्याऐवजी गुन्हेगारी कशी संपेल ? गुन्हेगारीतला माणूस कसा जागृत राहील यावर याच पुण्यातून केलेलं काम देखील राहिलं.पण सध्या पुण्यात वेगळंच काही सुरु आहे कि काय ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.सध्या सध्या पोलीस शिपायांवर काय घसरावं ? बडे बडे अधिकारी यांच्या कामात नीट लक्ष पसरावं..असं आता होऊन बसलं आहे.परदेशी कुटुंब ऐषोआरामात जगावं म्हणून करतात, अवॉर्ड मिळविण्यासाठी करतात,कि व्यवसाय/ धंदा म्हणून करतात कि खरोखर जन सेवा म्हणून ते नौकरी करतात ? हा प्रश्न आता त्यांना विचारावा अशी स्थिती आता निर्मण झाली असावी असं वाटलं तर नवल वाटणार नाही.. काहींना खासदार व्हायचं असतं हे पुण्यात आलेल्या एका आयुक्तांन दाखवून दिलेलं आहे ज्याने मुलींनी स्कार्फ घालायचा नाही असा फतवा काढला असेल. आमच्या पुणेकरांची स्मृती तशी चांगली आहे. आन आता ते अगदी नुकताच ससून रुग्णालयात घडलेला प्रसंगही कधी विसरतील असे वाटत नाही,भले माध्यमांनी आता त्याकडे कानाडोळा केला तरी वेळीच याच माध्यमांनी बरंच फैलावून ठेवलेलं आहे.आता खरी जबाबदारी आहे ती सातत्याने फॉलो अप घेण्याची आणि घटना न विसरण्याची..असे पोलिसातील आमचे सूत्रेच सांगत आहेत.
काय सांगतात आमचे सूत्रे..काय कळतंय आमच्या सूत्रांकडून..संपूर्ण महाराष्ट्राने आमदाराने चष्मेवाला,मास्क घातलेला एक इसम जो पायर्यांच्या बाजूला उभा होता त्याच्या गालफडात लगावली.अर्थात अगोदर १/२ पायरी आमदार खाली आले नंतर पुन्हा मागे फिरून त्यांनी ही थोबाडीत लगावली.हा व्हिडीओ माध्यमातील एकाने घेतला आणि तो व्हायरल देखील झाला,आमदारांनी याच कार्यक्रमात आपले नाव कोनशिलेवर नाही म्हणून संतापाने राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या एका कार्यकर्त्यावर देखील अशाच कानशिलात लागवल्याचे वृत्त प्रथम बाहेर आले होतेच आणि नंतर व्हिडिओत ज्याच्या थोबाडीत लगावली, हळू हळू ती व्यक्ती पोलीस असल्याचे निष्पन्न झाले.आणि महाराष्ट्रभर एकच गलका उडाला.खरे तर हा गलका पोलीस दलात उडायला पाहायला मिळायला हवा होता पण तसे काही दिसले नाही.माध्यमांच्या रेट्यानेसातत्याच्या माऱ्याने अखेरीस रात्री उशिरा या आमदारावर गुन्हा दाखल झाला अशी बातमी समजली.दुसऱ्या दिवशी म्हणे कोणाचा तरी तोल गेला आणि हळुवार,प्रेमाने गाल थोपटले अशा स्वरूपाचा आमदार सहज सुटेल असा सरकारी कामात अडथळा आणला असा गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल करतानाच गोलमाल गुन्हा दाखल केला गेला.भर कार्यक्रमात,भर गर्दीत पोलिसाच्या श्रीमुखात लगावने याचा अर्थ काय होतो? या आमदाराने एका पोलिसांवर नाही तर संपूर्ण पोलीस खात्यावर उगारलेला तो हाथ नव्हता काय ? या आंद्राने आता असे केले याहून आक्रमक आमदार आता यापुढे काय करतील देव जाणो ?जेव्हा पत्रकारांनी २ दिवसातच पुण्यात आलेल्या गृहमंत्र्यांना या मदरच्या कृत्याबाबत विचारले तेव्हा तर त्यांनी हा प्रश्नच अगदी हलक्यात घेतला. पोलिसांनी कारवाई केली आहे. आमदाराच्या पक्षाच्या अध्यक्षांनी तर म्हटले आमदाराची बाजू नको का ऐकून घ्यायला त्यांनी असे का केले ? हे समजून घेऊनच त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई काय करायची ते पाहू..म्हणजे झाले साऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षदा लावल्या..आणि पुणेकर समजले काय ते..
आता पुण्यातल्या साऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गाल थोपटण्याचं अर्थात प्रेमाने बरे..असे आंदोलन कोणी हाथी घेतलं तर गृहमंत्री किंवा नेत्यांनी आणि आयुक्तांनी टेन्शन घेण्याचे कारण नाही.असाच एखादा गुन्हा दाखल करण्याचीही त्यांनी तसदी घेऊ नये.
कारण त्यांना खरे सांगायचे हे कि हे कि, त्या आमदाराच्या जागेवर एखादा सामान्य माणूस असता तर पुण्याच्या पोलिसांनी काय केले असते ? आणि किती तत्परतेने केले असते. १६/ १७/ १८ वर्षाची पोरं बिघडलीत..गुन्हेगारी करायला लागली त्यांच्यावर कारवाई करताना आपला हेतू शतक पार करायचा असतो..त्यांना कुख्यात गुन्हेगार म्हणून त्यांच्या कपाळावर शिक्का मारण्याची घाई आपल्याला असते पण अशी पोरं अशा गुन्हेगारीच्या वाटेवर जाऊ नये म्हणून आपण काय करत असतो ? या प्रश्नाकडे खरेच आपण मनापासून लक्ष देतो काय ? हा विचार आयुक्तसाहेबांनी करायला हवा.अशी सूत्रांच म्हणणे आहे बरं..आमचे पुणेकर काय म्हणणार? हे तर आम्ही अनेक चित्रपटातून बघतोय यात नवीन काय ? पोलिसांना कोणी वाली नाहीच हे काय आम्हाला माहित नाय ?
आयुक्तसाहेब,’सुनील कांबळेंच्या जागी सामान्य माणूस असला तर अशीच कारवाई कराल ?
Date:

