लाडक्या बहिणींना 1500 मिळण्यास सुरूवात:तुम्हाला मेसेज आला का?

Date:

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेंतर्गत मे महिन्याचा हप्ता वितरणास सुरूवात केली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांना योजनेचा 11 वा हप्ता केव्हा मिळणार? हा प्रश्न निकाली निघाला आहे.

महायुती सरकारने गतवर्षी जुलै महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. तेव्हापासून आतापर्यंत महिलांना 10 हप्ते मिळालेत. पण मे महिना संपला तरी अद्याप महिलांना 11 वा हप्ता मिळाला नव्हता. पण आता हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाभार्थी महिलांना तसे मेसेज मिळण्यास सुरूवात झाली आहे.राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी बुधवारी रात्रीच एका पोस्टद्वारे मे महिन्याचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे.

महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या.

अदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा निधी आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे एखाद्या लाभार्थी महिलेला पैसे जमा झाल्याचा मेसेज आपला नसेल तर त्यांनी बँकेत जाणून आपल्या खात्याची स्थिती जाणून घ्यावी. संबंधित बँकेचे अॅप असेल तर त्यातही त्यांना हा निधी जमा झाला किंवा नाही हे पाहता येईल. तूर्त या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या लाखांत असल्यामुळे सर्वांच्या खात्यात पैसे जमा होण्यास 3-4 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे आज तुमच्या पैसे आले नसतील तर तुम्हाला पुढील एक-दोन दिवस वाट पहावी लागेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय...

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता;पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे, दि. १० फेब्रुवारी...

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर वाडेकर,सभागृहनेते बिडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे :विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित...

प्रभाग ९ मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

आयुक्तांसोबत बैठक घेऊन मिसिंग लिंकच्या कामांना गती देण्याचे निर्देश ना....