पुणे, दि.१५ मे: माईर्स एमआयटीचे माजी प्राचार्य व प्रभावी व्यक्तिमत्वाचे प्रा.डॉ. ललितकुमार क्षीरसागर (६९) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांना माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. ललितकुमार क्षीरसागर हे पेट्रोलियम इंजीनियरिंगचे प्राध्यापक म्हणून ४२ वर्षापूर्वी एमआयटी संस्थेत रूजू झाले. तत्पूर्वी ते ओएनजीसी सारख्या प्रख्यात कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. शिक्षकी पेशा असल्याने त्यांनी सतत एमआयटीच्या प्रगतीसाठी कार्य केले. एमआयटी मध्ये खाजगी शिक्षणक्षेत्रातील पहिल्या पेट्रोलियम डिपार्टमेंटची स्थापना त्यांनी केली. ओएनजीसी चेअरची स्थापना, संशोधन कार्याची पायाभरणी, जागतिक कीर्तीच्या सब.सी प्रयोगाची उभारणी, उद्योगभिमुखता, विद्यार्थी केंद्रित व उद्योगाभिमूख शिक्षणाचे प्रयोग असे त्यांच्या कार्याचे विविधांगी स्वरूप होते.
या प्रसंगी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “एमआयटीच्या विकासात डॉ.ललितकुमार क्षीरसागर यांनी मोलाचे योगदान दिले आहे. ते अतिशय निर्मळ व प्रांजळ व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल. चेहर्यावर सदैव हास्य ठेवून ते आयुष्य जगले. त्यांच्या अचानक जाण्याने संस्थेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
या वेळी माइर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा.पी.बी.जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. प्रसाद खांडेकर, डॉ. संजय उपाध्ये, प्रा.डॉ. दत्ता दंडगे आणि अन्य शिक्षक वर्गाने आपली भावना व्यक्त केली.
या वेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
एमआयटी तर्फे प्रा.डॉ. ललितकुमार क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रध्दांजली
Date:

