Pahalgam attack । पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पाकिस्तानला थेट पाठिंबा जाहीर केला आहे. त्याने याविषयी बोलताना ‘आपण भारतीय सैन्याला पाकिस्तानवर हल्ला करू देणार नाही’ असे म्हटले आहे.एवढेच नाही तर “भारताकडे पाकिस्तानशी लढण्याची हिंमत नाही,” असा दावाही पन्नूने केला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत त्यांच्यावर हल्ला करू शकतो असा पाकिस्तानला संशय असताना पन्नूने हे विधान आले आहे.
एका वृत्तवाहिनीनुसार पन्नूने,”आम्ही भारतीय सैन्याला पंजाबमधून जाऊन पाकिस्तानवर हल्ला करू देणार नाही.” असा इशारा त्याने दिला आहे. तसेचग ते पुढे म्हणाले, “पाकिस्तानशी लढण्याची हिंमत भारताकडे नाही. आम्ही, दोन कोटी शीख, पाकिस्तानसोबत खडकासारखे उभे आहोत.” असा मोठा दावा देखील त्याने केला आहे. त्याने आरोप करताना, “भारतात शीख आणि इतर अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे. आता काळ बदलला आहे, सध्या २०२५ सुरु आहे १९६५ किंवा १९७१ नाही.” असे देखील म्हटले.पन्नू यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “पाकिस्तानचे नावच पवित्रतेचे प्रतीक आहे आणि ते कधीही हल्ला करत नाहीत ही त्यांची परंपरा आहे. त्यांनी इशारा दिला, “जो कोणी हल्ला करतो त्याचा शेवट वाईट होतो – मग त्या इंदिरा गांधी असो, नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो.” मोदी, डोवाल, अमित शहा आणि जयशंकर यांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार शिक्षा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पन्नूने ,”भारताने राजकीय फायद्यासाठी पहलगाममध्ये स्वतःच्या हिंदूंची हत्या केली” असा गंभीर आरोप केला.

