‘अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे प्रदर्शन’ – १६ ते १९ मार्च दरम्यान आयोजन
पुणे : विवेकानंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने ‘अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपनगरातील शहरीकरणाच्या वाढत्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास मांडणारे हे प्रदर्शन आहे. रविवार, दिनांक १६ ते १९ मार्च २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन येथे प्रदर्शन होणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन १६ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रस्टचे चेअरमन ॲड. अभय छाजेड, सचिव जितेंद्र पितळीया आणि संचालक प्रसन्न देसाई यावेळी उपस्थित राहणार आहेत.
प्रा. हृषीकेश अष्टेकर, देवेंद्र देशपांडे, गरिमा बुरागोहैन, गुंजन महेश्वरी, मीनाक्षी सरावगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे संचालक आर्किटेक्ट प्रसन्न देसाई आणि समन्वयक आर्किटेक्ट शेखर गरुड यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पुण्याच्या परिघीय शहरीकरणाचा सखोल अभ्यास विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘अर्बन डिझाईन’ अभ्यासक्रमांतर्गत विविध अभ्यास प्रकल्प सादर केले आहेत. गेल्या आठ वर्षांत विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी हिंजवडी, खराडी, देहू, भूगाव, चिखली, नऱ्हे या भागांचा सखोल अभ्यास केला होता.
गेल्या आठ वर्षांपासून त्यांनी पुण्याच्या विविध दिशांमधील सहा परिघीय भागांचा सखोल अभ्यास केला आहे.अभ्यासातील महत्त्वाचे पैलूया अभ्यासात प्रतिमा, ओळख, संस्कृती व वारसा, भूगोल, पर्यावरण, अर्थव्यवस्था, वास्तुशैली, वाहतूक, पायाभूत सुविधा, सामाजिक सुरक्षितता इत्यादी सात महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. पुण्याच्या बाहेरील १०-१५ किमी अंतरावर शहरीकरणाची गती, सरकारी योजना, महामार्ग व सांस्कृतिक केंद्रे यांचा प्रभाव याचा यात विशेष अभ्यास केला आहे.
प्रदर्शन नागरिकांसाठी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत विनामूल्य खुले असेल.