पुणे-पिंपरी पाेलीस ठाण्याचे हद्दीत मेट्राे स्टेशन व इतर ठिकाणी वारंवार हाेणारे माेटार सायकल चाेरीच्या गुन्हया संर्दभात पाेलीसांनी अज्ञात माेटार सायकल चाेरटयांचा शाेध घेऊन माेटारसायकल चाेरांचा शाेध सुरु केला हाेता. त्यानुसार पिंपरी चिंचवड व पुणे शहर हद्दीतील १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तांत्रिक विश्लेषण आधारे आराेपींचा माग काडून दाेन आराेपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून २६ लाख १० हजार रुपये किंमतीच्या ५३ माेटारसायकल जप्ती करण्यात आल्या आहे. पिंपरी चिंचवड पाेलीस आयुक्तालय व आयुक्तालयाबाहेरील एकूण ३५ वाहनचाेरीचे गुन्हे उघडकीस आल्याची माहिती परिमंडळ एकच्या पाेलीस उपायुक्त स्वप्ना गाेरे यांनी दिली आहे.
धीरज प्रदीप सावंत (वय-२३,रा. नऱ्हेगाव,पुणे), बालाजी ऊर्फ तात्यासाहेब भाेसले (२४,रा. शाहुपुरी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. पिंपरी पाेलीस ठांण्याचे वपाेनि अशाेक कडलग यांचे मार्गदर्शनाखाली सपाेनि दिंगबर अतिग्रे यांचे पथक माेटारसायकल चाेरीच्या गुन्हयाचे घटनास्थळापासून माेटारसायकल चाेरी करुन घेऊन आराेपी गेलेल्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली. पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील विविध सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तपासणी करत असताना, पाेलीस अंमलदार एस जानराव यांना त्यांचे खबऱ्याकडून माहिती मिळाली की, माेरवाडी मेट्राेस्टेशन पिंपरी येथील माेटारसायकल पार्क केलेल्या ठिकाणी एक संशयित व्यक्ती फिरत अाहे. त्याप्रमाणे पिंपरी पाेलीसांचे पथक तातडीने सदर ठिकाणी जाऊन त्यांनी आराेपीचा शाेध घेऊन त्यास सापळा रचून ताब्यात घेत चाैकशी केली.
त्यावेळी आराेपीने वाहनचाेरीचे गुन्हे साथीदार साेबत केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातून एकूण ५३ माेटारसायकल पाेलीसांना मिळून आल्या आहे. आराेपींनी पिंपरी चिंचवड शहरात वाहनचाेरीचे २५ गुन्हे, पुणे शहरात चार गुन्हे, काेल्हापूर मध्ये दाेन गुन्हे तर सातारा मध्ये चार गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
100 हून अधिक CCTV तपासून दोन चोरट्यांनी चोरलेल्या 53 मोटारसायकली जप्त
Date:

