टाटा एआयए लाइफचा नवीन मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स पेन्शन फंड –
- निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित आणि समृद्ध असावे यासाठी नियोजन करणाऱ्यांसाठी एक अनोखी संधी
मुंबई, 25 फेब्रुवारी 2025: सेवानिवृत्ती नियोजन हे आता फक्त बचत करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, नव्या पिढीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सुज्ञपणे गुंतवणूक करणे हा देखील निवृत्ती नियोजनाचा एक मोठा भाग आहे. आजच्या काळात निवृत्त होऊ इच्छिणारे लोक आर्थिक स्वातंत्र्याची एक नवी व्याख्या रचत आहेत, त्यांची बदलती जीवनशैली, करिअर महत्त्वाकांक्षा आणि धनाविषयीची दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करणारे उपाय शोधत आहेत. FIRE (आर्थिक स्वातंत्र्य, लवकर निवृत्त) पिढी असो, करिअरमध्ये बदल करणारे व्यावसायिक असोत किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करणारे उद्योजक असोत, त्यांना आर्थिक सुरक्षा आणि संपत्ती निर्माण करण्याच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या गुंतवणूक योजना हव्या असतात.
लोकांमध्ये आर्थिक जागरूकता वाढत आहे आणि डिजिटल पोहोच वाढल्यामुळे गुंतवणूक करणे सोपे झाले आहे, त्यामुळे नवीन, लवचिक व विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या रिटायरमेंट योजनांची गरज वाढत आहे. पारंपारिक बचत साधने सुरक्षित आहेत परंतु आधुनिक गुंतवणूकदारांच्या गतिशील गरजा पूर्ण करण्यात अनेकदा अपयशी ठरतात. याच बाबतीत पुढील पिढीची वित्तीय उत्पादने, जसे की टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा (टाटा एआयए) नवीन एनएफओ, मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स पेन्शन फंड, उपयोगी ठरतो. लोकांना मार्केट-लिंक्ड, स्मार्ट योजना उपलब्ध करवून देऊन सक्षम बनवण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे, हा फंड त्यांना आपल्या आर्थिक भविष्यावर नियंत्रण ठेवून एक मजबूत रिटायरमेंट कॉर्पस बनवण्यात मदत करतो.
निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी नियोजन करणाऱ्यांसाठी हा फंड एक आदर्श पर्याय का आहे
सेवानिवृत्तीचे नियोजन हे फक्त बचत करण्यापुरते नाही तर जोखीम हाताळून तुमची संपत्ती वाढवणे देखील या नियोजनामध्ये असले पाहिजे. टाटा एआयएचा नवीन फंड क्वांट-आधारित गुंतवणूक धोरणाद्वारे पोर्टफोलिओ स्थिरता सुनिश्चित करताना बाजारातील वाढीच्या संधींचा फायदा घेण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. या फंडात गुंतवणूक करून, पॉलिसीधारक पुढील फायदे मिळवू शकतील:
- दीर्घकालीन भांडवल वाढ – मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी 50 इंडेक्सच्या गुंतवणुकीच्या तत्त्वांशी सुसंगत धोरणे, कामे करणाऱ्या, उच्च क्षमता आणि संभावना असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो.
- स्मार्ट डायव्हर्सिफिकेशन – संतुलित वाढीसाठी मोठ्या, मध्यम आणि स्मॉल-कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करतो.
- जोखीम आणि परतावा यांचा समतोल साधून गुंतवणूक – मूलभूतपणे मजबूत, उच्च-वाढीची क्षमता असलेले स्टॉक निवडण्यासाठी गती आणि गुणवत्ता घटकांचा वापर.
- लवचिक सेवानिवृत्ती नियोजन – टाटा एआयएच्या स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅनद्वारे उपलब्ध, जो पेन्शन लिंक्ड फायदे देतो.
- सुलभ पोहोच: टाटा एआयएची वेबसाईट आणि पॉलिसीबझार, टाटा नेउ आणि फोनपे सहित टाटा एआयएच्या डिजिटल पार्टनर इकोसिस्टिममार्फत ऑनलाईन, कोणत्याही वेळी, कुठूनही, कोणत्याही अडचणीविना गुंतवणूक करता येते.
फंडबद्दल मुख्य माहिती
- गुंतवणूक फोकस: मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी 50 इंडेक्सप्रमाणे धोरणे असलेल्या आणि कामे करणाऱ्या कंपन्या.
- मालमत्ता वाटप: इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये 80% -100%, रोख आणि मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये 0% -20%
- जोखीम प्रोफाइल: व्यवस्थापित जोखमीसह उच्च परतावा देण्यासाठी डिझाइन केलेले, ज्यामुळे स्थिरता सुनिश्चित होते.
- फंड व्यवस्थापन शुल्क (FMC): 1.35% प्रतिवर्ष
- नवीन फंड ऑफर (NFO) विंडो: 21 फेब्रुवारी 2025 रोजी उघडेल, 28 फेब्रुवारी 2025 रोजी बंद होईल.
ग्राहकांनी मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स पेन्शन फंडमध्ये गुंतवणूक का करावी:
- हा फंड लार्ज-कॅप्सच्या स्थिरतेचा आणि मिड- आणि स्मॉल-कॅप समभागांच्या उच्च वाढीच्या क्षमतेचा फायदा घेऊन मार्केट कॅप विभागात गुंतवणूक करतो.
- पोर्टफोलिओची मूलभूत ताकद सुनिश्चित करताना परतावा अनुकूल करण्यासाठी, विशिष्ट दिशेने मजबूत गती दाखवून देणाऱ्या, दर्जेदार स्टॉकवर लक्ष केंद्रित करते.
- हे इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये 80%-100% आणि रोख आणि मनी मार्केट साधनांमध्ये 0%-20% गुंतवणूक करते, ज्यामुळे वाढ आणि लिक्विडिटी यांच्यात प्रभावी संतुलन राखता येते.
- हा फंड मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी 50 इंडेक्सशी अलाइन्ड आहे, जो शिस्तबद्ध, नियम-आधारित गुंतवणूकीच्या तत्त्वांचे पालन करतो.
तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा एक स्मार्ट मार्ग
टाटा एआयएचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्री हर्षद पाटील म्हणाले: “आज सेवानिवृत्ती नियोजनासाठी अधिक चांगल्या, अधिक धोरणात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स पेन्शन फंड अशा गुंतवणूकदारांसाठी डिझाइन केले आहे ज्यांना त्यांचे भविष्य सुरक्षित करताना भारताच्या आर्थिक विकासाचा लाभ घ्यायचा आहे. गती आणि दर्जेदार गुंतवणूक यांचे संयोजन करून, आमच्या पॉलिसीधारकांना त्यांच्या निवृत्तीच्या वर्षांत आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यात मदत करून, जोखमीचे संतुलन साधून परतावा मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे.”
भारताची अर्थव्यवस्था दीर्घकालीन विस्तारासाठी सज्ज आहे. हा फंड पॉलिसीधारकांना त्यांच्या सेवानिवृत्तीची उद्दिष्टे पूर्ण करताना देशाच्या विकासात सहभागी होण्यास सक्षम करतो. तुम्ही नुकतेच नियोजन करायला सुरुवात करत असाल किंवा सेवानिवृत्तीच्या जवळ येत असताना जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, हा फंड तुमची संपत्ती वाढवण्याचा एक प्रभावी मार्ग प्रदान करतो.
पॉलिसीबझारचे लाईफ इन्श्युरन्सचे चीफ बिझनेस ऑफिसर, श्री संतोष अगरवाल म्हणाले, “भारतात, निवृत्तीचे नियोजन दीर्घकाळापासून केलेली वैयक्तिक बचत वापरण्यावर किंवा कुटुंबाच्या आधारावर अवलंबून राहण्यावर केंद्रित आहे, परंतु आता हे झपाट्याने बदलत आहे. हे परिवर्तन सुलभ करण्यासाठी आम्ही सहजसोप्या योजना आणण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही टाटा एआयएसोबत आम्ही एक पेन्शन फंड सादर करत आहोत जो केवळ संपत्ती निर्मितीवरच लक्ष केंद्रित करत नाही तर पोर्टफोलिओ स्थिरता देखील सुनिश्चित करतो आणि गुंतवणूकदारांच्या विविध गरजा पूर्ण करतो. आर्थिक नियोजनासाठी हा एक दूरदर्शी दृष्टीकोन आहे जो गुंतवणूकदारांना भारतीय अर्थव्यवस्थेत होत असलेल्या विकासाचा फायदा घेण्यास सक्षम बनवतो.”
टाटा डिजिटलचे इन्श्युरन्स विभागाचे चीफ बिझनेस ऑफिसर, श्री. अमरीश खेर म्हणाले, “निवृत्तीनंतरच्या गुंतवणुकीला योग्य दिशा देणे, पुढे नेणे अवघड वाटू शकते. युजर्ससाठी अनुकूल प्लॅटफॉर्म टाटा नेउ ही प्रक्रिया सहजसोपी बनवतो, याठिकाणी तुम्ही मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स पेन्शन फंडच्या नवीन फंड ऑफरसोबत टाटा एआयएच्या स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅनचा लाभ घेऊ शकता. हा फंड गुंतवणूकदारांना भारताच्या विकास गाथेमध्ये सहभागी होण्याची एक धोरणात्मक संधी प्रदान करतो, ज्यामध्ये जोखीम आणि रिटर्न्स संतुलित करणारे क्वान्टवर आधारित धोरण असते. फंडाचे तपशील समजून घेण्यापासून केवळ काही क्लिक्समध्ये गुंतवणूक सुरु करण्यापर्यंत, टाटा नेउ तुमच्या आयुष्याच्या सोनेरी वर्षांसाठी नियोजन करणे खूपच सोपे बनवू शकतो.”
स्वतःची रिटायरमेंट ग्रोथ जर्नी आजच सुरु करा!
टाटा एआयएच्या स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅनमार्फत मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स पेन्शन फंडमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही केवळ निवृत्तीसाठी बचत करत नाही, तर आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त भविष्यासाठी तुमची संपत्ती सुज्ञपणे वाढवता.
मुख्य वैशिष्ट्ये:
- स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅन अशा प्रकारे कस्टमाइज केला आहे की तो ग्राहकांना चिंतामुक्त जीवन जगण्यात मदत करतो. या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
- लवकर सेवानिवृत्ती योजना: वयाच्या ४५ व्या वर्षी पूर्ण सेवानिवृत्तीची सुविधा!
- मार्केट–लिंक्ड रिटर्न्स: ॲसेट क्लासमध्ये बरेच फंड आहेत आणि 100% फंड इक्विटीमध्ये वाटप करण्याचा पर्याय देखील आहे. कोणत्याही शुल्काशिवाय अनेक वेळा फंड स्विच करू शकतो, त्याची कोणतीही मर्यादा नाही.
- परवडणारी योजना: तुमचा संपूर्ण प्रीमियम तुमच्या आवडीच्या फंडात गुंतवला जातो, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या इच्छित निवृत्तीचा मार्ग मोकळा होतो.
- गुंतवणुक करत राहिल्याबद्दल बक्षिसे: ऑनलाइन खरेदीबरोबरीनेच अतिरिक्त फंड बूस्टर आणि लॉयल्टी ॲडिशन्ससह येतात.
- टाटा एआयए हेल्थ बडी: आनंदी आणि “निरोगी” सेवानिवृत्ती सुनिश्चित करण्यासाठी, टाटा एआयए हेल्थ बडी ही एक पूरक सेवा आहे जी ग्राहकांच्या सोयीनुसार फार्मसी खरेदी आणि निदान चाचण्यांवर आकर्षक सवलत देते. हेल्थ सिक्युअर रायडरची निवड करून ग्राहक ओपीडी सेवा देखील घेऊ शकतात.
- कर लाभ: कलम 80CCC अंतर्गत कर वाचवा आणि मॅच्युरिटीवर एकरकमी 60% करमुक्त लाभ मिळवा.
- अतिरिक्त संरक्षण कव्हरेज: संकटाच्या वेळी कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रीमियममध्ये सूट देण्याचा पर्याय.
टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने त्यांच्या इतर युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (ULIPs) द्वारे फंड कामगिरीमध्ये मापदंड स्थापित केले आहेत. कंपनीच्या फंडांनी मार्केट बेंचमार्कपेक्षा सरस कामगिरी केली आहे.
टाटा एआयए फंडांची कामगिरी: गेल्या पाच वर्षांचे रिटर्न्स* (सीएजीआर)
टाटा एआयए फंड्स | फंड रिटर्न (%) ** | बेंचमार्क रिटर्न (%) ** |
मल्टी कॅप फंड | 25.32% | 16.17% |
टॉप २०० फंड | 25.80% | 16.17% |
इंडिया कन्झम्पशन फंड | 24.16% | 16.17% |
** ३१ जानेवारी २०२५ पर्यंतचा डेटा. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील कामगिरीचे सूचक नाही.
फंड बेंचमार्क: मल्टी कॅप फंड, इंडिया कंझम्पशन फंड, टॉप 200 फंड: S&P BSE 200.
स्थापनेची तारीख: टॉप 200 फंड: 12 जानेवारी 2009, मल्टी कॅप फंड: 05 ऑक्टोबर 2015, इंडिया कन्झम्पशन फंड: 05 ऑक्टोबर 2015.
31 जानेवारी 2025 पर्यंत, टाटा एआयएने व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (AUM) 1,18,721 कोटी रुपयांपर्यंत लक्षणीयरीत्या वाढवली आहे, म्हणजेच वार्षिक 27.36% ची वाढ झाली आहे. हे मजबूत वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम उत्पन्न आणि अपवादात्मक गुंतवणूक कामगिरीमुळे शक्य झाले आहे.
टीप: गुंतवणूकदारांनी त्यांच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचे काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे, कारण फंडामध्ये उच्च जोखीम प्रोफाइल आहे. मागील कामगिरी भविष्यातील परिणामांचे सूचक नाही.