नावीन्य, ग्राहक–केंद्री दृष्टिकोन आणि लोकांना प्राथमिकता देण्याच्या संस्कृतीप्रती बांधिलकीने वेगाने विकसित होत असलेल्या व्यावसायिक वातावरणामध्ये टीसीएसचे नेतृत्व मजबूत केले आहे
न्यूयॉर्क/मुंबई, १८ फेब्रुवारी २०२५: माहिती तंत्रज्ञान सेवा, कन्सल्टिंग आणि व्यावसायिक उपाययोजनांमध्ये जागतिक स्तरावर आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) (BSE: 532540, NSE: TCS) फॉर्च्युन® मॅगझीनच्या २०२५ च्या जगातील सर्वात प्रशंसनीय कंपन्यांच्याTM यादीमध्ये स्थान दिले आहे. हे यश टीसीएसच्या ग्राहक-केंद्री नावीन्यामार्फत दीर्घकालीन मूल्य प्रदान करण्याची, लोकांना प्राथमिकता देणाऱ्या प्रभावी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची आणि आपल्या एआय व नेक्स्ट-जेन क्षमता वाढवण्याची क्षमता अधोरेखित करते.
कॉर्पोरेट प्रतिष्ठेतील एक मापदंड मानली जाणारी, फॉर्च्युन®ची जगातील सर्वात प्रशंसनीय कंपन्यांचीTM यादी पात्र कंपन्यांच्या ३३०० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, संचालकांच्या व आर्थिक विश्लेषकांच्या सर्वसमावेशक सर्वेक्षणावर आधारित आहे. त्यासाठी उद्योगक्षेत्रातील ६५० कंपन्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. दोन दशकांहून जास्त काळापासून फॉर्च्युनने वार्षिक रँकिंग संकलित करण्यासाठी जागतिक ऑर्गनायझेशनल कन्सल्टिंग फर्म कॉर्न फेरीसोबत हातमिळवणी केली आहे. संघटनांचे मूल्यांकन नावीन्य, जागतिक स्तरावर व्यापार करण्याची क्षमता, प्रतिभा आकर्षित करण्याची, विकसित करण्याची व कायम राखण्याची क्षमता तसेच समुदाय व पर्यावरणाप्रती जबाबदारीचे पालन या निकषांच्या आधारे केले जाते.
फॉर्च्युनच्या मुख्य संपादक एलिसन शोंटेल म्हणाल्या, “फॉर्च्युनच्या यावर्षीच्या जगातील सर्वात प्रशंसनीय कंपन्यांच्या यादीमध्ये सामील करण्यात आलेल्या सर्व कंपन्यांचा आम्हाला अभिमान आहे. हे यश संपादन करण्याची त्यांची क्षमता खरोखरीच प्रभावी आहे. आव्हानात्मक जागतिक व्यवसाय वातावरणामध्ये देखील उच्च मानके, लवचिकता आणि दूरदर्शीपणाचे हे प्रमाण आहे.”
हे यश मिळवून देणारा एक प्रमुख घटक टीसीएस पेस™इनोवेशन इकोसिस्टिम आहे. यामध्ये टीसीएसची अनोखी कार्यप्रणाली, जागतिक अंतर्दृष्टी, संशोधन, बौद्धिक प्रतिभा आणि को-इनोवेशन नेटवर्क TM(COIN™)चा उपयोग केला जातो. हे नेटवर्क नेक्स्ट-जनरेशन उपाययोजना विकसित करण्यासाठी ग्राहक, सहयोगी, स्टार्टअप आणि शिक्षणतज्ञ यांना एकत्र आणते. लंडन, पॅरिस आणि स्टॉकहोममध्ये टीसीएस पेस पोर्ट™केंद्रांचा विस्तार, सुविधांची संख्या १२ पर्यंत वाढवणे, या गोष्टी सहयोगी दृष्टिकोन अजून मजबूत करतात, एआय, रोबोटिक्स आणि नवनवीन तंत्रज्ञानामध्ये यशाला गती प्रदान करतात.
टीसीएसचे उत्तर अमेरिकेचे अध्यक्ष श्री अमित बजाज यांनी सांगितले, “हे स्थान नावीन्य आणि ग्राहक-केंद्री दृष्टिकोन, अव्वल प्रतिभांना आकर्षित करून स्वतःकडे कायम ठेवण्याची क्षमता, आमच्या ग्राहकांसाठी उच्च मूल्य असलेले व्यावसायिक परिवर्तन सक्षम करण्याचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड यांच्याप्रती टीसीएसची बांधिलकी अधोरेखित करते. व्यवसायांना सातत्याने अडीअडचणींचा सामना करावा लागतो, आम्ही त्यांना एक अनुकूलित उद्यम बनण्यासाठी सक्षम बनवतो, त्यामुळे त्यांना दीर्घकालीन विकास व लवचिकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात मदत मिळते.”
डिजिटल नावीन्याच्या पलीकडे जाऊन, टीसीएस डिजिटल ट्विन तंत्रज्ञानासारख्या उपक्रमांमार्फत सस्टेनेबिलिटीला पुढे नेते, ज्यामुळे औद्योगिक व वाणिज्यिक संचालनामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मदत मिळते. जगातील पहिले हायड्रोजन-चालित विमान इंजिन विकसित करण्यासाठी रोल्स-रॉयससोबत त्यांची भागीदारी अधिक शाश्वत भविष्य तयार करण्याप्रती त्यांची बांधिलकी मजबूत करते.
तंत्रज्ञानामध्ये अतिशय वेगाने होत असलेले बदल, पुरवठा शृंखलेमध्ये क्रांती, ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये होत असलेली वाढ अशा सध्याच्या काळात व्यवसायांना कायम आघाडीवर राहण्यासाठी सातत्याने नावीन्य व अनुकूलन करणे आवश्यक आहे. टीसीएस या गुंतागुंतीतून बाहेर पडून पुढे जाण्यासाठी आघाडीच्या व्यवसायांसोबत सहयोग करते, विकास आणि लवचिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी एआय, क्लाऊड, सायबर सुरक्षा, स्वयंचालन आणि प्रगत कम्प्युटिंगमध्ये अत्याधुनिक डिजिटल उपाययोजनांचा लाभ घेते. आपल्या अनेक ग्राहकांसोबत फॉर्च्युनच्या यादीमध्ये मिळालेले स्थान, व्यवसाय परिवर्तनासाठी एक धोरणात्मक प्रवर्तक म्हणून टीसीएसची भूमिका अधोरेखित करते.
टीसीएसला फॉर्च्युनच्या यादीमध्ये मिळालेले स्थान लोकांना प्राथमिकता देण्याची त्यांची बांधिलकी दर्शवते. लोकांच्या आचरणातील उत्कृष्टतेसंदर्भात काम करणारे जागतिक प्राधिकरण, टॉप एम्प्लॉयर्स इन्स्टिट्यूटने यावर्षी टीसीएसला त्यांचे एंटरप्राइज-वाईड टॉप एम्प्लॉयर सर्टिफिकेशन दिले, हे टीसीएससाठी एक खूप मोठे यश आहे. सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये कामाच्या ठिकाणच्या प्रथांमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्टता प्रदर्शित करणाऱ्या, निवडक संघटनांना हा प्रतिष्ठित सन्मान दिला जातो. याखेरीज टीसीएसला २०२५ साठी ग्लोबल टॉप एम्प्लॉयर म्हणून मानांकन देण्यात आले. हा मजबूत पाया टीसीएसला आघाडीच्या प्रतिभा आकर्षित करण्यात व त्या कायम राखण्यात सक्षम बनवतो, हे सुनिश्चित करतो की, त्यांचे मनुष्यबळ नावीन्य व व्यावसायिक यशाचे प्रमुख चालक बनेल. टीसीएस आपल्या कर्मचाऱ्यांच्या समाधानावर खूप भर देते आणि कौशल्यवृद्धी उपक्रमांमार्फत एआयसाठी सज्ज मनुष्यबळ तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे.
आयटी सेवांमध्ये टीसीएसच्या नेतृत्वाला उद्योग विश्लेषकांनी आणि बाजारपेठ रँकिंगने सातत्याने मान्यता दिली आहे. या वर्षीच्या सुरुवातीला ब्रँड फायनान्सच्या २०२५ आयटी सेवा रँकिंगनुसार, कंपनीचे ब्रँड मूल्य २० बिलियन डॉलर्सच्या पुढे पोचले. हे यश मिळवणारी टीसीएस ही दुसरी जागतिक आयटी सेवा कंपनी बनली आहे.