आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धा-विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे आयोजन
पुणे : भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि कोल्हापूरच्या डीवायपीसीईटी संघ यांच्यात विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित आर्किटेक्चर महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्समधील फुटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटाची अंतिम लढत रंगणार आहे.
वानवडी येथील एस. आर. पी. एफ.च्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत भारती विद्यापीठ संघाने सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर टायब्रेकमध्ये ४-२ने मात केली. निर्धारित वेळेत ही लढत गोलशून्य बरोबरीत सुटली होती. यानंतर टायब्रेकमध्ये भारती विद्यापीठकडून आर्यसेन काळे, ऋतुराज वाडेलकर, दीपक कश्यप, दिव्यांक मोदक यांनी गोल केले, तर सिंहगड कॉलेजकडून आकाश उटे आणि शुभम बडे यांनाच गोल करता आले.
दुसऱ्या उपांत्य लढतीत सुजल हळदेने (१५ मि.) केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर कोल्हापूरच्या डीवायपीसीईटी संघाने मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली आणि अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या गटातील उपांत्य फेरीच्या लढतीत समृद्धी शेंडेच्या (२० मि.) एकमेव गोलच्या जोरावर भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली.
निकाल : उपांत्य फेरी – बास्केटबॉल मुले – मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ३३ वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी – ३०; सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ३७ वि. वि. ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ३२.
मुली – पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – २३ वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी – ११.
व्हॉलिबॉल मुले – डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी वि. वि. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी-चिंचवड २५-१४, २०-२५, १५-१३; पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २४-१३, २५-१८.
मुली – भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २५-११, २५-१५; सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी २५-२३, २५-१७.