आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धेला आजपासून सुरुवातविवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे आयोजन
पुणे : मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एमएमसीओए) आणि ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर (बीएसओए) या संघांनी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित आर्किटेक्चर महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्समधील फुटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.
वानवडी येथील एस. आर. पी. एफ.च्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उद्घाटन सैन्य अधिकारी नम्रता पाटील, राष्ट्रीय बास्केटबॉलपटू तन्वी साळवे, सचिव जितेंद्र पितळीया यांच्या हस्ते झाले.
यात फुटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटातील उद्घाटनच्या लढतीत मराठवाडा संघाने भारतीय कला प्रतिष्ठान संस्थेच्या संघाचा ७-०ने पराभव केला. यात मराठवाडा संघाकडून मोहित (८, ६३ मि.), यश (११, २४, २७ मि.), चिराग (२२ मि.), थोटपे इंगशे (३२ मि.) यांनी गोल केले. यानंतर ब्रिक संघाने भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीचा १-०ने पराभव केला. यात अंश अगरवालने १८व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आण सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्यातील लढत ०-० अशी बरोबरीत सुटली.
निकाल : फुटबॉल – मुली – १. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी-चिंचवड – ० बरोबरी वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ०. २. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ० बरोबरी वि. ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ०.
बास्केटबॉल – मुले – ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ४५ वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ३५. मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ३९ वि. वि. डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी – ३३.
मुली – मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – २७ वि. वि. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १८.
व्हॉलिबॉल – मुले – सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. आयोजन स्कूल ऑफ डिझाईन २५-११, २५-१९. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी-चिंचवड वि. वि. भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी २५-६, २५-१२.
मुली – मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. आयोजन स्कूल ऑफ डिझाईन २५-१९, २५-१२.
‘मराठवाडा’, ‘ब्रिक’ संघाचा विजय
Date: