· दररोज 8,000 लीटर पिण्यायोग्य पाणी निर्मितीची या युनिट्सची उत्पादन क्षमता आहे
· या उपक्रमाचा लाभ बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि मुंबई येथील 4,200 कर्मचाऱ्यांना होतो
मुंबई: आयसीआयसीआय बँकेने आपल्या उपक्रमांची शाश्वतता वाढविण्याच्या दृष्टीने वातावरणातील आर्द्रतेपासून पिण्याचे पाणी तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची घोषणा केली आहे. वातावरणातील आर्द्रतेपासून दररोज 8,000 लीटर पिण्यायोग्य पाणी तयार करण्यासाठी बँकेने युनिट्स स्थापित केली आहेत, ज्यामुळे बेंगळुरू, हैदराबाद आणि मुंबईतील प्रत्येकी एक आणि चेन्नईमध्ये दोन अशा पाच कार्यालयांतील 4,200 कर्मचाऱ्यांना फायदा झाला.
वातावरणातील आर्द्रतेचे रूपांतर 100% सूक्ष्मजंतूमुक्त, ताजे आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्यात करण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणारे हे युनिट ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेटर (AWGs) म्हणून ओळखले जातात. द्रवीभवनाने पाण्याच्या वाफेचे थेंबांमध्ये रूपांतर होते, आणि त्यानंतर शुद्धतेसाठी त्यांना अनेक चाचण्यांमधून जावे लागते. प्रक्रियेच्या शेवटी आवश्यक मिनरल्स त्यात जोडली जातात. AWGs संपूर्ण वर्षभर पाणी तयार करू शकतात कारण ते सभोवतालचे तापमान (18°C- 45°C) आणि सापेक्ष आर्द्रता (25%-100%) मध्ये कार्य करू शकतात.
आयसीआयसीआय बँकेचे ग्रुप चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर श्री. सौमेंद्र मट्टागजसिंग म्हणाले, “आम्ही आमचा व्यवसाय शाश्वत उपाय आणि जबाबदारीने पार पाडण्यासाठी तसेच आमच्या कामकाजामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत. वातावरण आणि पर्यावरण संवर्धनासाठी आमची रणनीती पर्यावरणीय कारभाराच्या 4R (रिड्युस, रियूज, रिसायकल आणि रिस्पॉन्सिबल डिस्पोजल) या तत्त्वानुसार आहे. वातावरणातील आर्द्रता ही पृथ्वीवरील सर्व नद्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर ताज्या पाण्याचा सोर्स आहे. या नूतनीकरणीय साधनाचा लाभ घेण्यासाठी, पाण्याची वाफ पिण्याच्या पाण्यात रूपांतरित करण्यासाठी आम्ही आमच्या कार्यालयात AWG स्थापित केली आहे. या उपक्रमामुळे वातावरणातील ओलाव्याचा चांगला वापर करण्याबरोबरच पॅकेज्ड पाण्यावरील आपले अवलंबित्व कमी होते.”
ESG धोरणाच्या अंतर्गत ICICI बँक शाश्वततेसाठी उपक्रम राबवत आहे. बँकेने आर्थिक वर्ष 2032 पर्यंत स्कोप 1 आणि स्कोप 2 उत्सर्जनामध्ये कार्बन न्यूट्रल होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 4.95 दशलक्ष चौरस फुटांवर व्यापलेल्या बँकेच्या 180 हून अधिक साइट्स इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) प्रमाणित (31 मार्च 2024 पर्यंत) आहेत. बांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बँकेचे सर्व्हिस सेंटर आर्थिक वर्ष 2024 मध्ये ‘नेट झिरो वेस्ट’ प्रमाणित म्हणून घोषित करण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत बँकेने आर्थिक वर्ष 2024 मध्ये तिचा अक्षय्य ऊर्जा वापर 75.73 दशलक्ष kWh एवढा चौपट केला. आर्थिक वर्ष 2022 पासून 3.7 दशलक्ष झाडे लावली आणि शाळा आणि जलकुंभांमध्ये दरवर्षी 25.8 अब्ज लीटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण केली.
* स्कोप 1 उत्सर्जन हे थेट हरितगृह (GHG) उत्सर्जन आहे जे एखाद्या संस्थेच्या मालकीच्या किंवा नियंत्रित स्त्रोतांमधून होते.
* स्कोप 2 उत्सर्जन हे अप्रत्यक्ष GHG उत्सर्जन आहे जे वीज, स्टीम, उष्णता किंवा शीतलक खरेदीशी संबंधित आहे.